jaysinh mohite patil criticises bjp and ranjitsinh naik nimbalkar after dhairyasheel wins in madha constituency
jaysinh mohite patil criticises bjp and ranjitsinh naik nimbalkar after dhairyasheel wins in madha constituency  Saam Digital
लोकसभा २०२४

जयसिंहंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हिशोबच बाहेर काढला, भाजपचे मानले आभार; रणजितसिंह मोहिते पाटलांना नेमका काय दिला सल्ला

भारत नागणे

माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेला विजय हा ना धैर्यशील मोहिते पाटील, ना विजयसिंह माेहिते पाटील ना जयसिंह माेहिते पाटील यांचा आहे, हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी रात्रंदिवस काम केल्याने धैर्यशील हे खासदार झालेत. दरम्यान विराेधकांनी माळशिरस तालुक्यात 24 कोटी रुपयांचा चुराडा मतदान पूर्वी करुनही मतदारांनी त्यांना नाकारल्याचे सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

जयसिंह मोहिते पाटील म्हणाले भाजपने मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली नाही त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. कारण जर भाजप मधून निवडून आलो असतो तर तो विजय भाजपचा झाला असता. आपण जिंकलाे असलाे तरी आजचा विजय हा मोहिते आणि पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा झाला आहे.

जयसिंह मोहिते पाटील यांनी भाजप सोबत असलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कठीण राजकीय काळात देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडू नये असा सल्ला त्यांना दिला. तसेच फडणवीस यांनी कठीण काळात मोहिते पाटील यांना मदत केली आहे. याची जाणीव आपल्याला असल्याची कृतज्ञता मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Termeric Water Benefits: पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या झटपट वजन कमी करा

Indian Cricket's Net Worth | विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटर्सच्या संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

Success Story : २० वर्षे बँकेत नोकरी, ५० व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय; देशातील सर्वात श्रीमंत महिला CEO बद्दल जाणून घ्या!

Dive Ghat Pune : पुण्यातील दिवे घाटात दुचाकीसमोर अचानक बिबट्या आला अन्....पाहा VIDEO

Pandharpur video: VIP दर्शनामुळे भाविकांचे हाल; विठुरायाच्या दर्शनसाठी मोठी गर्दी!

SCROLL FOR NEXT