Dharashiv : वाशी नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा, संतप्त महिलांचा ठिय्या;गेले अधिकारी कुणीकडे?

vashi villagers morcha at nagar panchayat office : गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील विविध गावांत पाण्याची कमतरता भासू लागली आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
vashi villagers morcha at nagar panchayat demands regular water supply
vashi villagers morcha at nagar panchayat demands regular water supply Saam Digital
Published On

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व नागरीकांचे होणारे हाल थांबविण्याच्या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. या माेर्चा महिला माेठ्या संख्येने सहभागी झाल्या हाेत्या.

वाशी येथे नगरपंचायत मार्फत करण्यात येणारा पाणी पुरवठा हा सुरळीत नाही. त्यामुळे टॅंकरचा आधार नागरीकांना घ्यावा लागत आहे. परिणामी आर्थिक बाेजा नागरिकांवर पडत आहे. तसेच अनेकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

vashi villagers morcha at nagar panchayat demands regular water supply
30 हजार रुपयांच्या रिक्षाला ठाेठावला गेला सव्वा लाखाचा दंड, RTO राबविणार राज्यभरात माेहिम; जाणून घ्या उच्च न्यायालयाचा निर्णय

त्यामुळे संतप्त झालेल्या स्वराज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान आंदाेलकांचे गा-हणे ऐकण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे फोनद्वारे संबधितांना पाणी सुरळीत करण्याची मागणी आंदाेलकांना करावी लागली.

Edited By : Siddharth Latkar

vashi villagers morcha at nagar panchayat demands regular water supply
Sindhudurg: कामचुकारपणा करण्यापेक्षा समस्या सोडवा, आमदार वैभव नाईकांचे अधिका-यांना खडेबाेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com