Sanjay Raut Saam Tv
लोकसभा २०२४

Sanjay Raut On PM Modi: आम्हाला जेलमध्ये टाकले आता तुमचा नंबर, संजय राऊतांचा इशारा

Jalgaon Loksabha Election 2024: जळगावमध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील आणि जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत जळगावमध्ये आले होते.

Priya More

संजय महाजन, जळगाव

'आम्हाला जेलमध्ये टाकले आता तुमचा नंबर.', असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सराकारला (Modi Government) दिला आहे. जळगावमध्ये (Jalgoan) झालेल्या सभेदरम्यान संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

जळगावमध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील आणि जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत जळगावमध्ये आले होते. यावेळी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीची सभा झाला. या सभेला संजय राऊत यांच्यासोबत, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे नेते देखील उपस्थित होते.

संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, 'महाराष्ट्र लुटायचे म्हणून यांनी दोन पक्ष फोडले. ४०० पार नाही तर आम्ही तडीपार करू. ४०० पारचे जनता ठरवेल. मुंबई महाराष्ट्रामध्ये नको म्हणून मोदी गुजरातला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता मोदी येणार नाही. खोक्याचा हिशेब शांत करू. आम्हाला जेलमध्ये टाकले आता तुमचा नंबर आहे.', असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

'मोदी देशभर गॅरेंटी देत आहेत. तुम्ही विजय होणार का त्याची गॅरेंटी नाही. तु्न्ही काय केले त्याचा हिशोब द्या. आपल्या विकासाचा वाटा हे गुजरातला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. २५० खोके घेऊन घरात बसलेले नेते आपली सभा पाहत आहेत.' असा टोला मारत संजय राऊत यांनी 'महाविकास आघाडीचे उमेदवार दोन्ही पाटलांना विजयी करा.', असे आवाहन जळगावकरांना केले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्र पवित्र करण्याची वेळ आली आहे. चार जूननंतर यांना बाहेर फिरता येणार नाही. निवडणूक होईपर्यंत तुतारी आणि मशाल घरा घरात पोहोचवा.पान टपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री केले. त्याला घरी बसवायची वेळ आली आहे.', अशी टीका संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली. त्याचसोबत, 'निष्वतंत ताकद काय असते हे दाखवून द्या.', असे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

Thackeray Brothers : राज-उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, विजयी मेळाव्याआधी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT