Rahul Gandhi: जातनिहाय जनगणना माझ्यासाठी जीवनाचं मिशन; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

Rahul Gandhi Criticized BJP: जातनिहाय जनगणना माझ्यासाठी राजकारणाचा विषय नाही. हे आता माझ्या जीवनाचं मिशन आहे, असं मोठं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा क्रांतिकारी असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi Criticized BJP
Rahul Gandhi Criticized BJPSaam Tv

प्रमोद जगताप साम टीव्ही, मुंबई

दिल्लीमध्ये आज समृद्ध भारत फाउंडेशनच्या वतीन सामाजिक न्याय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी दिल्लीच्या जवाहर भवन या ठिकाणी असलेल्या संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत झाली आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा (Congress Monifesto) क्रांतिकारी असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना, जातनिहाय जनगणना माझ्यासाठी राजकारणाचा विषय नाही. हे आता माझ्या जीवनाचं मिशन आहे, असं मोठं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे. मला जातीत इंटरेस्ट नाही. मला 'त्या' जातींना न्याय मिळवून द्यायचा आहे, असं राहुल गांधी (Rahul Gandhi On Caste Census) म्हणाले आहेत. देशात ९० टक्के लोकांना न्याय मिळत नाही. मी फक्त यावर जनगणना करा असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

काँग्रेसचा जाहीरनाम्याला न्यायपत्र (Nyay Patra) असं नाव देण्यात आलंय. या न्यायपत्रात सामाजिक न्यायाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. सामाजिक न्यायासाठी जातनिहाय जणगणनेसोबतच अनेक आश्वासन देण्यात आली आहेत. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरनाम्याला घाबरले (Rahul Gandhi On PM Modi) असल्याचं म्हटलं आहे, तर तुम्हाला जाहीरनामा आवडला का? असा उपस्थितांना सवाल केला आहे.

राजकारणात कॉम्प्रमाइज केलं जातं. लाईफ मिशनमध्ये कॉम्प्रमाइज केलं जात नाही, असं राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले आहेत. मागासवर्ग शब्द ठीक वाटत नाही. मात्र, तुमचा इतिहास पुसला आहे. तो पु्न्हा लिहायचा आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत तुमचा मोठा वाटा आहे, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे.

Rahul Gandhi Criticized BJP
Rahul Gandhi: 'सूरत'वरून धुरळा! राहुल गांधी संतापले; म्हणाले, संविधान संपवण्याच्या दिशेने एक पाऊल!

जातीय जनगणनेला कोणती शक्ती रोखू शकणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राम मंदिरात आमचा एकही व्यक्ती दिसला नाही. नव्या संसदेचं उद्घाटन झालं त्यावेळी एकही दलीत, आदिवासी नव्हता. राष्ट्रपती आदिवासी आहेत. त्यांनाही कार्यक्रमाला बोलावलं नाही, अशी टीका राहुल गांधींनी (Rahul Gandhi Criticized BJP) केली आहे.

माध्यमांमध्ये दलित, ओबीसी नाहीत. माध्यमांना पैसा ओबीसीतून जातो. त्यांना का संधी दिली जात नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ६५० उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यात फक्त १०० न्यायाधीश ओबीसी असल्याचं त्यांनी म्हटलं (Rahul Gandhi On BJP) आहे. मोदी म्हणतात, देशात फक्त श्रीमंत आणि गरीब जात आहे. मग श्रीमंतांच्या जाती काढून पाहा. गरीबांमध्ये दलित ओबीसी निघतील, असा टोला यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

Rahul Gandhi Criticized BJP
Rahul Gandhi: अन्नातून विषबाधेनंतर राहुल गांधी पुन्हा सक्रिय; अमरावती, सोलापुरात उडवणार प्रचाराचा धुरळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com