Sharad Pawar Vs Radhakrishna Vikhe-Patil  Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: विखेंचा निरोप घेऊन उद्योगपती पवारांच्या भेटीला? निलेश लकेंच्या उमेदवारीवरून पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Vs Radhakrishna Vikhe-Patil : शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर केलेल्या आरोपमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. अहमदनगरमधून लंकेंना उमेदवारी देऊ, नये यासाठी विखे पाटलांनी मुंबईतील बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sharad Pawar Vs Radhakrishna Vikhe-Patil : अहमदनगर दक्षिण मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. सुजय विखेविरुद्ध निलेश लंके यांच्यातील लढतीत दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर केलेल्या आरोपमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. अहमदनगरमधून लंकेंना उमेदवारी देऊ, नये यासाठी विखे पाटलांनी मुंबईतील बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय. तर खोटं बोल पण रेटून बोल, हा शरद पवारांचा धंदा असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केलीय.

दरम्यान सुजय विखेंनी निलेश लंकेंवर केलेल्या टीकेचाही शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. काही दिवसांपूर्वीच निलेश लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवावं असं निलेश लंकेंना खिजवलं होतं. यावर संसदेत कोणत्याही भाषेत बोलता येतं असा पलटवार पवारांनी केलाय.

निलेश लंकेंच्या रुपाने 2019च्या निवडणुकीचा हिशोब चुकता करण्याची संधी शरद पवारांना मिळालीय. म्हणूनच निलेश लंकेंच्या प्रचारात शरद पवार जातीने लक्ष घालतायत. निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात उतरल्यामुळे सुजय विखेंसाठी यंदाची लढत सोप्पी राहिलेली नाही. त्यात निलेश लंकेंची उमेदवारी रद्द करण्यासाठी विखेंनी उद्योगपतींनाच धाडल्याच्या आरोपांमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.. राधाकृष्ण विखेंनी शरद पवारांचे आरोप फेटाळले आहेत.. मात्र पवारांनी डागलेली तोफ विखेंच्या गडाला सुरुंग लावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Mukhija: 'दुबईच्या शेखने १५ कोटी दिले, तर त्याच्यासोबत...'; रिबेल किड अपूर्वा मुखीजाच्या वक्तव्यावरून नवा वाद

Cough Syrups : डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळणार कफ सिरप; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे-शिर्डी एक्स्प्रेस रोज धावणार; थांबे किती आणि फायदे काय?

सोन्यापेक्षाही महाग आहे 'हे' फळ, किंमत वाचून धक्काच बसेल

Maharashtra News Live Update: संपूर्ण शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक

SCROLL FOR NEXT