Yogi Adityanath SAAM TV
लोकसभा २०२४

Yogi Adityanath: मोदी तिसऱ्यांदा PM झाल्यास 6 महिन्यात POK भारताच्या ताब्यात असेल, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर वाचवणेही अवघड होत चालले आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होताच, सहा महिन्यांत पीओके भारताचा ताब्यात असेल, असं ते म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Yogi Adityanath On POK:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर वाचवणेही अवघड होत चालले आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होताच, सहा महिन्यांत पीओके भारताचा ताब्यात असेल, असं ते म्हणाले आहेत.

योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत की, ''ब्रिटनच्या एका मोठ्या वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली की, पाकिस्तानात मागच्या तीन वर्षात मोठे आतंकवादी मारले गेले, त्यामध्ये भारताच्या गुप्तचर विभागाचा हात आहे. पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरला वाचवणे अवघड होतं आहे. निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा मोदीजी ना प्रधानमंत्री बनू द्या, पुढच्या सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारताचा हिस्सा असेल.

योगी म्हणाले, ''काँग्रेस सरकार आले तर राम मंदिराचे काय करायचे हे आम्ही ठरवू, असे म्हणतात. पण राम लल्ला तुम्हाला दिल्लीत पोहोचू देणार नाही. कोर्टाचा निर्णय आला तर दंगली होतील, असे हे त्यावेळी सांगायचे. निर्णय आला आणि राम मंदिर देखील झालं. पण एकही दंगल झाली नाही.''

वारसा कराच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, जुन्या पक्षात औरंगजेबाचा आत्मा शिरला आहे. त्यांनी वारसा कराची तुलना औरंगजेबाने गैर-मुस्लिम नागरिकांवर लादलेल्या जिझिया कराशी केली आहे.

ते म्हणाले, काँग्रेस ही महात्मा गांधींची काँग्रेस राहिलेलं नाही, ज्याचे नेतृत्व सरदार पटेल आणि लोकमान्य टिळकांनी केले होते. ही काँग्रेस म्हणजे सोनिया काँग्रेस, राहुल काँग्रेस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

Palak Pakoda Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत पालक भजी, पावसाळ्यात चटपटीत नाश्ता

High Court Notice To BCCI: आईशप्पथ, खेळाडूंनी फस्त केली ३५ लाखांची केळी, बीसीसीआयचा बीपी वाढला; हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खिळे कोणी ठोकले? MSRDC नं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT