Kangana Ranaut Vs Vikramaditya Singh From Mandi Lok Sabha Constituency Saam TV
लोकसभा २०२४

Kangana Ranaut in Mandi: कंगना रणौत मंडीत सुपरहिट, विजयाच्या दिशेने वाटचाल

Satish Kengar

हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसत आहे. येथे चारही लोकसभा जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत 31 हजार मतांनी आघाडीवर आहे. कंगनाची थेट स्पर्धा काँग्रेस उमेदवार विक्रमादित सिंग यांच्यासोबत आहे. मंडी लोकसभा जागेवर एकूण 10 उमेदवारांमध्ये निवडणूक लढत आहे. कंगना व्यतिरिक्त आणखी एक महिला उमेदवार राखी गुप्ता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.

पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर कंगना रणौत 31 हजार मतांनी आघाडीवर आहे. कंगनाला 225654 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंग यांना आतापर्यंत 194563 मते मिळाली आहेत.

कंगनाला एकूण मतांपैकी 52 टक्के मते मिळाली. यातच हमीरपूर लोकसभा मतदारसंघातही भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर 72676 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकूर यांना 59 टक्के मत मिळाले.

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या राजीव भारद्वाज यांना 323324 मते मिळाली असून ते 119571 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार आनंद शर्मा यांना आतापर्यंत 203753 मते मिळाली आहेत. शिमला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश कुमार कश्यप आघाडीवर आहेत. त्यांना 257359 मते मिळाली असून ते 38659 मतांनी पुढे आहेत. तर काँग्रेसचे विनोद सुलतानपुरी यांना 218700 मते मिळाली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजितचा संघर्षमय प्रवास, वाचा

Bhau Kadam : कॉमेडी किंग भाऊ कदमचा सिरियल किलर अंदाज, मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी पाहाच

Healthy Fruits: स्ट्रॅाबेरी ते अननस; ही आहेत पौष्टिक आणि निरोगी असणारी फळे

SCROLL FOR NEXT