Sujitsingh Thakur Saam Tv
लोकसभा २०२४

Sujitsingh Thakur: अजित पवारांचं भाषण सुरू असताना माजी आमदाराला आली भोवळ, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Dharashiv News: धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या प्रचार रॅलीदरम्यान भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sujitsingh Thakur News:

>> बालाजी सुरवसे

देशात आणि राज्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. यातच अनेकांना उष्मघाताचा फटका बसताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ४२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद देखील झाली आहे. यातच आज धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या प्रचार रॅलीदरम्यान भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांचं भाषण सुरू असताना सुजितसिंह ठाकूर चक्कर आली. यावेळी घटनास्थळी असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी सुजितसिंह ठाकूर यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहीती मिळत आहे ठाकूर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

दरम्यान, याआधी धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनाही प्रचारादरम्यान चक्कर आल्याची घटना घडली होती. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार रॅलीदरम्यान त्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि ते चक्कर येऊन खाली पडले होते. त्यांनाही त्यावेळी कार्यकर्त्यांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवले होते;.

पालघरमध्ये उष्माघाताने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

राज्यातील उष्णाघाताच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यातच मंगळवारी पालघरमध्ये उष्माघाताने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अश्विनी विनोद रावते असं या मृत मुलीचे नाव आहे. तसेच याआधी उष्माघातामुळे नांदेडमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यभरात तीव्र उष्णेतची लाट पसरली आहे आणि पुढील काही दिवशी अशीच परिस्थिती राहू शकते. यातच जर तृम्ही तुम्ही दुपारी 1 ते 3 दरम्यान घराबाहेर पडणार असाल तर, स्वतःची काळजी घ्या. उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करा. तसेच वेळोवेळी पाणी पित राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर

loan waiver : मोठी बातमी! शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी नाहीच, पण सरकार घेणार मोठा निर्णय

Aditi Tatkare: पूरग्रस्त भागातील 'लाडकी'साठी आदिती तटकरेंचा मोठा निर्णय, पालकमंत्र्यांना केली विनंती

Latur : लातूरमध्ये पुन्हा अतिमुसळधार पाऊस, आज शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Ladki Bahin Yojana Update: सरकारनं e-KYC करण्याचे का दिले निर्देश? बहिणींनो,छोट्याशा चुकीनं बँक खातं होईल रिकामं

SCROLL FOR NEXT