Pankaja Munde Saam Tv
लोकसभा २०२४

Pankaja Munde: 'ही शेवटची संधी मला द्या, पाच वर्ष मी घरी बसले, पण तळतळ जीव तुटत होता', पंकजा मुंडेंची मतदारांना भावनिक साद

Beed Lok Sabha: ''घडी गेली की पीडी जाते. पाच वर्ष मी घरी बसले, पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी'', असं म्हणत आज भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Satish Kengar

Pankaja Munde News:

''घडी गेली की पीडी जाते. पाच वर्ष मी घरी बसले, पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी'', असं म्हणत आज भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीड येतील प्रचार सभेला संबोधित करत त्यांनी मतदारांना भावनिक साद घालत, मी एवढंच म्हणेन, पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या, असं म्हटलं आहे.

यावेळी त्या म्हणाल्या आहेत की, ''पंकजा मुंडेंना म्हणजे गोपीनाथ मुंडेंना मतदान असं मी म्हणणं नाही. कारण माझ्या वडिलांचा चुकून जर अवमान होणार असेल, तर तो मी या जन्मात करणार नाही. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे नाही, मात्र त्यांची स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. जे तुमच्यासाठी होते, ते पूर्ण करण्याची अशी संधी येणार नाही. घडी गेली की पीडी जाते. पाच वर्ष मी पाच वर्ष मी घरी बसले, पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी.''

उपस्थित लोकांना संबोधित करत त्या म्हणाल्या की, ''मला एक रुपयाचीही लालसा नाही. लालसा फक्त एकाच गोष्टीची आहे, तो चार तारखेचा अपूर्ण राहिलेला जो किस्सा आहे, तो पूर्ण करायचा आहे. दूध पोळल्यावर ताकही फुंकून पितो माणूस. त्यामुळे ही निवडणूक सोप्पी आहे, इतके लाख देऊ, तितके लाख देऊ, प्रत्येकजण बोलतोय. मात्र तुम्ही (कार्यकर्ते) डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, इथं प्रत्येकजन जे बोलतोय आणि त्याच्या आजूबाजूचे लोकं काय करत आहेत.''

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ''धनंजय मुंडे बोलत असतांना मी समोर सुंदर चंद्र पहात होते, त्यावर काळे ढग आले होते, मात्र क्षणभर थांबून ते निघून गेले. तसे काळे ढग आपल्या विकासावर आले नाही पाहिजे, अन्यथा विकास होणार नाही.'' कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, तुम्ही प्रीतम, येशू, धनंजय, आर्यमन पेक्षाही प्रिय आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

SCROLL FOR NEXT