EX PM Manmohan Singh Letter: Saamtv
लोकसभा २०२४

Manmohan Singh on Modi: 'देश वाचवण्याची शेवटची संधी, मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली', डॉ. मनमोहन सिंह यांचा पत्रातून हल्लाबोल!

Gangappa Pujari

देशातील लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १ जून रोजी या २ जागांसह उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसामध्ये मतदान होणार आहे. तत्पुर्वी देशाचे माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांनी पंजाबमधील मतदारांना पत्र लिहले. या पत्रामधून त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत मतदारांना आवाहन केले.

मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या मतदारांना आवाहन केले की, केवळ काँग्रेसच विकासाभिमुख प्रगतीशील भविष्य सुनिश्चित करू शकते.जिथे लोकशाही आणि संविधानाचे रक्षण केले जाईल. भाजपला वाटते की देशभक्ती, शौर्य आणि सेवा केवळ चार वर्षांची किंमत आहे. यावरून त्यांचा खोटा राष्ट्रवाद दिसून येतो. असे म्हणत मनमोहन सिंह यांनी अग्निवीर योजनेवरुनही केंद्र सरकारवर निशाणा साधला.

'या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणाऱ्या राजकीय भाषणांवर मी बारकाईने लक्ष ठेवून आहे. मोदी द्वेषयुक्त भाषणे करत आहेत. जे पूर्णपणे फूट पाडणारी आहेत. मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी सार्वजनिक भाषणाची प्रतिष्ठा कमी केली आणि त्यामुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने समाजातील कोणत्याही विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी असे दुर्भावनापूर्ण, असंसदीय आणि असभ्य शब्द वापरलेले नाहीत.

तसेच "पंतप्रधान मोदींनी माझ्याबाबत काही चुकीची विधानेही केली आहेत. मी माझ्या आयुष्यात कधीही एका समाजाला दुसऱ्या समाजापासून वेगळे केले नाही. यावर भाजपचा एकमेव कॉपीराइट आहे, असा टोलाही डॉ. मनमोहन सिंह यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live : मराठवाड्यात मुसळधार पाऊस; धरणं आणि प्रकल्प काठोकाठ भरली

Nandurbar Police : नंदूरबार पोलीस विभागात खळबळ, पोलीस निरीक्षकासह दोघे सस्पेंड, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, आता थेट संपत्तीवर होणार कारवाई

Pankaja Munde : मी कुणासमोर झुकणार नाही, पंकजा मुंडेंचा कुणाला इशारा?

Tulsi Benefits: रोज रिकाम्या पोटी तुळशीचे पानं खाल्लयामुळे काय होईल?

SCROLL FOR NEXT