Election 
लोकसभा २०२४

Lok Sabha Elections 2024: मतदारांना मिळेल उमेदवारावरील गुन्ह्यांची माहिती; निवडणूक आयोगाकडून KYC लॉन्च

Lok Sabha Elections 2024 KYC App Updated: निवडणूक आयोगाचे केवायसी ॲप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युझर्ससाठी तयार करण्यात आले आहे. निवडणुकीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे. या ॲपच्या माध्यमातून उमेदवाराची छोटी- मोठी सर्व माहिती मिळणार आहे

Bharat Jadhav

Know Your Candidate App :

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने KYC (Know Your Casndidate) अ‍ॅप लॉन्च केले आहे. या अ‍ॅपमुळे मतदारांना होणारा भावी खासदार चांगला आहे का नाही. त्याच चारित्र्य चांगलं आहे का नाही, या सर्व गोष्टी आता माहिती होणार आहेत. खासदारकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांवर किती गुन्हे आहेत कि नाहीत याची माहितीही मतदारांना मिळणार आहे.(Latest News)

हे ॲप खास मतदारांसाठी तयार करण्यात आले आहे. लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची पार्श्वभूमी तपासू शकणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली होती. मतदारांना त्यांच्या उमेदवारांची माहिती असणे आवश्यक आहे, यामध्ये ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल.

निवडणूक आयोगाचे केवायसी ॲप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युझर्ससाठी तयार करण्यात आले आहे. निवडणुकीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे. या अॅपच्या माध्यमातून उमेदवाराची छोटी- मोठी सर्व माहिती मिळणार आहे.

निवडणुकीला उभा राहिलेल्या उमेदवारावर कोणते गुन्हेगारी आरोप आहेत का? याची सर्व माहिती या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. याच बरोबर उमेदवारांच्या नावावर किती संपत्ती आहे. रोख रक्कम किती आहे. दरम्यान उमेदवारांना वृत्तपत्र आणि टीव्हीवर त्यांच्यावरील क्रिमिनल रिकॉर्डस काय आहेत याचीही माहिती देणं आवश्यक आहे. इतकेच नाही तरी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवाराला पक्षाने तिकीट का दिलं हेही सांगावे लागेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशभरातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुक काळात होणारे गैरप्रकार करताना आढळल्यास मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभने दाखवल्यास कडक कारवाई होईल, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT