Loksabha Election 2024: खबरदार! दारु, साड्या, पैसे वाटताना दिसला तर १० मिनिटात... निवडणूक आयुक्तांचा गर्भित इशारा

Maharashtra Lok Sabha Election Date Announced 2024: लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशभरातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Maharashtra Lok Sabha Election Date Announced
Maharashtra Lok Sabha Election Date Announced Saamtv
Published On

Loksabha Election Schedule 2024:

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशभरातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच निवडणुक काळात होणारे गैरप्रकार करताना आढळल्यास, मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभणे दाखवल्यास कडक कारवाई होईल, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे.

निवडणूक आयुक्तांचा थेट इशारा..

"आगामी निवडणूक काळात हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आमच्यासमोर मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी आम्ही योग्य ती तयारी केली आहे. त्याप्रमाणे केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील. चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत, ड्रोन मार्फत निरीक्षण केले जाईल," असे राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी सांगितले आहे.

"राजकीय पक्षांसाठी आम्ही सूचना तयार केल्या आहेत. लहान मुलांना प्रचार करायला लावण्याला सक्त बंदी आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणी फुकट वस्तू वाटत असेल तर कारवाई होईल. कुठे पैसा, दारु, कुकर वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲपवर टाका, तुमच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून १० मिनिटात आमची टीम तिथे पोहोचेल," असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे.

Maharashtra Lok Sabha Election Date Announced
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक करणार मतदान, पहिल्यांदाच मतदार करणाऱ्यांची संख्या किती?

तसेच "प्रचार काळात टीका- टिप्पणी करु शकता. मात्र कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल, धार्मिक तेढ होईल असे वक्तव्य, द्वेष वाद किंवा भावना दुखावणारे वक्तव्य केल्यास, आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई होईल. अशी विधाने टाळावीत," असेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Lok Sabha Election Date Announced
School CCTV Footage: शाळेत विद्यार्थ्यांच्या शौचालयात CCTV कॅमेरा; संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com