Maharashtra Election Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: येत्या आठवड्यात कल्याण डोंबिवलीत प्रचारसभांचा धडाका; सलग ३ दिवस दिग्गज नेत्यांच्या सभा

Maharashtra Election: उद्या १२ मे रोजी रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची कल्याण पश्चिमेतील यशवंतराव क्रीडांगण येथे संध्याकाळी ६ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख

कल्याण-डोबिंवली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. येत्या २० मे रोजी मतदान होणार असून प्रचारासाठी अवघे ८ दिवस हातात आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या आठवडाभरात कल्याण डोंबिवलीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांचा धुरळा उडणार आहे.

उद्या १२ मे रोजी रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची कल्याण पश्चिमेतील यशवंतराव क्रीडांगण येथे संध्याकाळी ६ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यापाठोपाठ सोमवारी १३ मे रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. तर ठाकरेंच्या सभेच्या एक दिवसानंतर म्हणजेच १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण पश्चिमेला जाहीर सभा होणार आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. या तिन्ही दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमुळे काळात कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरणही चांगलेच ढवळून निघणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT