Dr Manmohan Singh, LK Advani, Mohammad Hamid Ansari and Dr Murli Manohar Joshi cast votes from home Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: डॉ.मनमोहन सिंह आणि हमीद अन्सारी यांनी घरून केलं मतदान, वयोवृद्ध मतदारांसाठी आयोगाने केली विशेष व्यवस्था

Delhi Lok Sabha: लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, उर्वरित तीन टप्प्यातील मतदानाचा प्रचार जोरात सुरू आहे. दिल्लीत 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, उर्वरित तीन टप्प्यातील मतदानाचा प्रचार जोरात सुरू आहे. दिल्लीत 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दिल्लीतील निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील वृद्ध आणि अपंग मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत शुक्रवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांनी नवी दिल्ली लोकसभा जागेसाठी त्यांच्या घरातून मतदान केले.

जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन मतदानाची प्रकारीया करून घेतली. यासोबत माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या घरीही निवडणूक अधिकारी पोहोचले आणि त्यांनी घरून मतदान केले. यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनीही घरून मतदानाचा हक्क बजावला.

दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने सर्व सात लोकसभा मतदारसंघांसाठी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक आणि अपंग लोकांसाठी घरपोच मतदान सुविधा सुरू करून पुढाकार घेतला आहे. 85 वर्षे व त्यावरील वृद्ध आणि अपंगांना त्यांच्या घरच्या आरामात मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ही सुविधा 24 मे पर्यंत सुरू राहणार आहे.

दिल्लीत 5,472 वृद्ध आणि अपंग मतदार आहेत. ज्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांनी आगामी निवडणुकांसाठी घरबसल्या मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म 12D भरला होता. ज्या मतदारांना घरबसल्या मतदान करायचे आहे, त्यांच्यासाठी दिल्ली निवडणूक आयोगाच्या सीईओनेही तयारी केली आहे. महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाने ही सुविधा दिली आहे.

घरून मतदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये मतदान कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची संपूर्ण टीम समाविष्ट असते, जे मतदानादरम्यान अत्यंत गोपनीयता पाळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT