Devendra Fadnavis  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

>> हिरा ढाकणे

मोदी सरकार येण्याआधी सातारा जिल्ह्यातला दुष्काळ दूर होऊ शकतो, असं कोणाला वाटलं नव्हतं. मोदी यांचं सरकार आल्यानंतर सातारा जिल्ह्यातला दुष्काळ हा भुतकाळ आम्ही करत आहोत. राष्ट्रीय नेते बाजूला असताना त्यांना फलटण बारामती रेल्वे आणता आली नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.

माढा लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण, सातारा येथे आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस असं म्हणजे आहेत.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणकरांचे चोरीला गेलेले पाणी परत आणले, या भागात फलटण-बारामती रेल्वे आणली आणि 23 वर्ष बंद असलेल्या फलटण-पंढरपूर रेल्वेच्या कामासाठी 921 कोटीची मंजूरी मिळवली. यासोबतच पुणे-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर हा सुमारे 50,000 कोटींचा प्रकल्प त्यांच्याच पाठपुराव्यामुळे सुरू होतो आहे. या कॉरिडॉरभोवती सुरू होणार्‍या एमआयडीसी मुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

या सभेत उपस्तीथन उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणजे की, ''या विकासकामांमुळे विरोधकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु देव तारी त्याला कोण मारी, आणि येथे जनता म्हणजेच देव आहे. याच जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली आहे. अस्मिता, विकास आणि जनतेच्या विरोधात निर्णय घेणार्‍यांना जनता कधीच माफ करत नाही. आता जनता तुतारीची पिपाणी करणार यात शंका नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT