Rahul Gandhi And Mallikarjun Kharge
Rahul Gandhi And Mallikarjun Kharge Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेसची मोठी घोषणा

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. शुक्रवारी ते म्हणाले की, केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिले जाईल. पक्षाच्या 'नारी न्याय' गॅरंटी संदर्भ देत राहुल म्हणाले की, 50 टक्के सरकारी पदांवर महिलांची भरती केली जाईल. यामुळे देशातील प्रत्येक महिला सक्षम होईल आणि सशक्त महिला भारताचे भविष्य बदलतील.

राहुल गांधींनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले आहेत की, 'आजही तीनपैकी एक महिलाच का नोकरी करते? 10 सरकारी नोकऱ्यांपैकी फक्त एकाच पदावर महिला का?'' असा प्रश्न उपस्थित केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल गांधी म्हणाले, ''भारतात महिलांची संख्या 50 टक्के नाही का? उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणात महिलांची उपस्थिती 50 टक्के नाही का? असेल तर मग व्यवस्थेत त्यांचा वाटा इतका कमी का?'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''काँग्रेसची इच्छा आहे के, अर्धी लोकसंख्या, पूर्ण अधिकार. आम्हाला माहित आहे की, महिलांच्या क्षमतेचा तेव्हाच उपयोग होईल जेव्हा देश चालवणाऱ्या सरकारमध्ये महिलांचे समान योगदान असेल. त्यामुळे सर्व नवीन सरकारी नोकऱ्यांमधील निम्मी भरती महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. आम्ही संसद आणि विधानसभेतील महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या बाजूने आहोत.''

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ''सुरक्षित भविष्य, स्थिरता आणि स्वाभिमान असलेल्या महिला खऱ्या अर्थाने समाजाची शक्ती बनतील.'' ते म्हणाले की, '50 टक्के सरकारी पदांवर महिलांच्या भरतीमुळे देशातील प्रत्येक महिला सक्षम होईल आणि सशक्त महिला भारताचे भविष्य बदलतील.'

दरम्यान, काँग्रेस आगामी लोकसभेसाठी आपला निवडणूक जाहीरनामा 6 एप्रिल रोजी राजस्थानमधील जयपूर येथे प्रसिद्ध करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे जयपूर येथील सभेत पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूड अभिनेत्रींचे आईसोबतचे फोटो पाहिलेत का?

Gautami Patil: क्युटनेस अलर्ट! कातिल गौतमीचा गोड लूक!

Mr. And Mrs Mahi Trailer : स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमान्स... 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

Today's Marathi News Live : 800 नेत्यांना जेलमध्ये ठेवलंय; मल्लिकार्जुन खरगे यांचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

Janhvi Kapoor: नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सजली जान्हवी; लूकवर खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT