congress leader vishal patil to fill form for sangli constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Sangli Constituency: पक्ष माझी उमेदवारी जाहीर करेल, विशाल पाटलांना विश्वास; सांगली मतदारसंघ आमचाच, पण... : बाळासाहेब थाेरात

काॅंग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीत आज शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढणार आहेत. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी सांगली शहरातील महापुरुषांचे पुतळ्यांना अभिवादन केले.

विजय पाटील

Vishal Patil :

सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षावर आणि आमच्या घराण्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांबराेबर चर्चा केली. त्यांच्या सगळ्यांचा सूर एकच आहे. आपण अर्ज भरला पाहिजे. पक्षाने किंवा महाविकास आघाडीने कोणी चूक केली आहे माहित नाही. पण भाजपचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणे गरजेचे आहे असे सर्वांचे मत असल्याचे आज (मंगळवार) सांगली लाेकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले काॅंग्रेस नेते विशाल पाटील यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सांगली लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काॅंग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने मतदारसंघातील काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची माेठ्या प्रमाणात नाराजी आहे. या नाराजीतून विशाल पाटील यांच्या समर्थकांनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरावा असा आग्रह धरु लागले आहेत.

पाटील पुढं बाेलताना म्हणाले यंदाची 14 वी लोकसभा निवडणूक आहे. आमच्या ग्रामदेवताचं दर्शन घेऊन आमची परंपरा आहे तसे आम्ही अर्ज भरला आहे. थाेड्याच वेळात कलेक्टर ऑफिसच्या दिशेने आम्ही निघणार आहाेत.

पाटील म्हणाले ही बंडखाेरी नव्हे. जर 22 तारखेपर्यंत अर्ज राहिला तर बंडखोरी. 19 एप्रिलला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा. मला विश्वास वाटतो एकंदरीत परिस्थिती पाहता काँग्रेस पक्षाची ताकदीचा महाविकास आघाडी याचा विचार करेल. मला पक्ष निश्चित उमेदवारी येईल असा मला विश्वास आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सांगलीची जागा नैसर्गिक रित्या आमची, पण... : बाळासाहेब थाेरात

विशाल पाटील यांच्याकडे अजूनही एबी फॉर्म काँग्रेसचा नाही. काँग्रेसच्या सेंट्रल कमिटी मध्ये विशाल पाटील यांचे नाव होतं. सांगली नैसर्गिक आमची जागा होती. आमचा परंपरागत उमेदवार आहे. ती जागा आम्हांला मिळावी अशी अपेक्षा होती. त्यामुळे कार्यकर्त्याची भावना साहजिक आहे. पण जेव्हा आघाडीत आपण पुढे जात असतो. त्याचे काही फायदे तोटे तोटेही स्वीकाराचे असतात असे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थाेरात यांनी स्पष्ट केले.

दरम्यान अजूनही विशाल पाटील यांच्याशी बोलून, स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीच पाऊल उचलले जाणार नाही याची काळजी घेत असल्याचे थाेरात यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Andolan: 'फक्त १० रुपयांत मुंबईत मोफत राहा', मराठा आंदोलकांसाठी अनोखी शक्कल; 'तो' मेसेज होतोय व्हायरल

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबईत पावसाचा जोर वाढला, मराठा बांधव प्लॅटफॉर्मवर

Maharashtra Live News Update: पुण्यात ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक, आंदोलनाची दिशा ठरवणार

500 साड्या, 50 किलो दागिने अन् चांदीची भांडी; 'Bigg Boss 19'च्या घरात घेऊन येणारी तान्या मित्तल आहे तरी कोण?

Maratha Aarakshan: मराठा आंदोलकांची रात्र कशी गेली? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT