लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत ४६ जणांच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी काँग्रेसने मोठी रणनिती आखली आहे. वाराणसी मतदारसंघातून मोदींविरोधात काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे वाराणसीत 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्यानंतर वाराणसी मतदारसंघ हा काँग्रेसला देण्यात आला आहे. काँग्रेसने वाराणसीमधून अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांचा या मतदारसंघात चांगलाच दरारा आहे. (Lok Sabha Election 2024)
२०१४ आणि २०१९ मध्येही अजय राय यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता. तरी देखील अजय राय यांनी नरेंद्र मोदी यांना चांगलीच टक्कर दिली होती. आता ते तिसऱ्यांदा मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमका कुणाच विजय होणार? याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. (Breaking Marathi News)
दरम्यान, काँग्रेसने जाहीर केलेल्या ४६ उमेदवारांच्या यादीमध्ये आसाम, अंदमान निकोबार,छत्तीसगड, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोरम, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश , उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातील उमेदवारांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातील ४ मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा गोंदियातून प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील ८ लोकसभेच्या जागेवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.