code of conduct cases in amravati hingoli nanded lok sabha election 2024 Saam tv
लोकसभा २०२४

Code Of Conduct : युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिका-यासह रेल्वे स्टेशन मास्तर, व्यापा-यावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखल; नांदेडला माेठा शस्त्रसाठा जप्त

अमरावती, हिंगाेली येथे आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हे नाेंद करण्यात आले आहेत. नांदेड शहरात माेठा शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलिस दल सक्रिय झाले आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे / संदीप नागरे / संजय सूर्यवंशी

Amravati Lok Sabha Constituency :

शासनाची परवानगी न घेता अमरावती शहरात महिलांचा हळदी कुंक मेळावा आयाेजित केल्याने युवा स्वाभिमानी पक्षाच्या पदाधिका-यावर राजापेठ पोलिसांत आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यंदाच्या लाेकसभा निवडणुक कालावधीतील अमरावती जिल्ह्यात आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा नुकताच नाेंदविला गेला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिका-यावर गुन्हा

अमरावती येथे आयाेजिलेल्या हळदी कुंकवाच्या मेळाव्यात 200 पेक्षा अधिक महिलांचा सहभाग हाेता. या महिलांना भेटवस्तू वाटण्यात आल्या. शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी सूरज मिश्रा यांच्या विरोधात पाेलिस ठाण्यात आचारसंहिता भंगचा गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

हिंगाेली आचारसंहिता भंगचे दाेन गुन्हे

हिंगोली जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. रेल्वे स्थानकावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा पोस्टर आढळल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी स्टेशन मास्तर यांच्या विरोधात गुन्हा नाेंदविला आहे. दरम्यान हिंगोलीच्या इंद्रा चौक मार्केटमध्ये दुकानावर शिवसेनेचे पोस्टर लावल्या प्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. (Maharashtra News)

नांदेड शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त

नांदेडच्या वजीराबाद पोलिसांनी शहरातून 49 तलवारी, 94 खंजर, 7 गुप्ती आणि दोन बिचवा असा माेठा शस्त्रसाठी जप्त केला आहे. लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाेलिस विभागास दिले होते.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

त्यानुसार वजीराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वात पथकाने गुरुद्वारा परिसरातील तीन दुकानांवर धाडी टाकल्या. यावेळी माेठा शस्त्रसाठा आढळून आला. पाेलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याची एक लाख 23 हजार किंमत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माणिकराव कोकाटे विजयाच्या उंबरठ्यावर

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT