Cm Eknath Shinde Saam Tv
लोकसभा २०२४

Eknath Shinde : PM मोदींप्रमाणे मी सुद्धा एकही सुट्टी न घेता काम करतोय: CM शिंदे

Naresh Mhaske : विराट रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करत नरेश म्हस्के यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीमधील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक म्हात्रे

मुंबई: मी घरात बसून काम करत नाही. यापूर्वी ही तिकडे असताना मीच काम करत असायचो. पंतप्रधानांप्रमाणे मी ही एकही सुट्टी न घेता काम करतोय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

विराट रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करत नरेश म्हस्के यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीमधील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पाकिस्तानला दम दिला. पाकिस्तानने देशाकडे वटारून पाहिलं तर पाकिस्तानात घुसून मारू. यापूर्वी ही सर्जिकल स्ट्राईक करुन घुसलो होतो असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी यांच्यासह उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यापूर्वी ठाणे शहरात महायुतीच्या वतीने विराट रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित पानसे उपस्थित होते.

Eknath Shinde And Naresh Mhaske

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ठाणेकरांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. नरेश म्हस्के यांना दिले जाणारे मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मिळणारे मत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं. यंदाची निवडणूक ही विकासाची निवडणूक असून देशाला खरोखरच पुढे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे लागतील. पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणलीय. देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक भर घालणारे आपले राज्य आहे.

पाच ट्रीलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर त्यासाठी एमएमआर रिजनचा त्यात मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी या जागेवर महायुतीचेच उमेदवार जिंकायला हवेत. त्यासाठी एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT