Sangli Loksabha Constituency News:  saam tv
लोकसभा २०२४

Sangli loksabha: चंद्रहार पाटील आज मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार; काँग्रेस नेते विश्वजित कदम उपस्थित राहणार?

Sangli Loksabha Constituency News: चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीनंतर बंडखोरीच्या तयारीत असलेले काँग्रेसचे विशाल पाटील, तसेच आमदार विश्वजित कदम काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजय पाटील

सांगली|ता. १९ एप्रिल २०२४

सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, नितीन बानगुडे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. मात्र चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीनंतर बंडखोरीच्या तयारीत असलेले काँग्रेसचे विशाल पाटील, तसेच आमदार विश्वजित कदम काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगलीत आज शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी चंद्रहार पाटील हे शक्तिप्रदर्शन करत रॅली काढणार असून प्रचार सभा देखील पार पडणार आहे. चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीचे सांगली जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान चंद्रहार पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 नंतर ते स्टेशन चौकात येतील आणि तिथून भव्य शक्तिप्रदर्शन करीत त्यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली निघणार आहे. या रॅलीची सांगता ही मारुती चौक येथील शिवतीर्थावर होणार असून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून चंद्रहार पाटील यांच्या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत होणार आहे.

दरम्यान, चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच विश्वजित कदम यांचाही चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी विश्वजित कदम उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

Morning tea: चहा पिण्यापूर्वी ही 1 सोपी गोष्ट करा; अॅसिडिटी किंवा जळजळीचा त्रास होणार नाही

Maharashtra News Live Update: इंगळून घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू, प्रशासन सतर्क

धावत्या ईव्ही बंद करणारं अॅप, वाहन चालकांना चिनी अॅपचा धसका

Sunday Horoscope : कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला करिअरमध्ये घ्यावी लागेल मोठी काळजी? वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT