Tejasvi Surya Saam Tv
लोकसभा २०२४

Tejasvi Surya: भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावर निवडणूक आयोगाने दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election 2024: बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धर्माच्या आधारावर मत मागितल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने (EC) तेजस्वी सूर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धर्माच्या आधारावर मत मागितल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने (EC) तेजस्वी सूर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, तेजस्वी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी धर्माच्या आधारावर मते मागितली होती.

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लिहिले आहे की, "X हँडलवर व्हिडिओ पोस्ट करून धर्माच्या आधारावर मते मागितल्याबद्दल खासदार आणि बेंगळुरू दक्षिणचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध 25.04.24 रोजी जयनगर पोलिस स्टेशनमध्ये कलम 123(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.''

काय म्हणाले होते तेजस्वी सूर्या?

X हँडलवर पोस्ट करत तेजस्वी सूर्या म्हणाले होते की, ''भाजपकडे 80 टक्के लोक आहेत, जे पक्षाला समर्थन देतात. मात्र त्यांना फक्त 20 टक्के लोक मतदान करतात. काँग्रेसकडे फक्त 20 टक्के लोकच त्यांना पाठिंबा देतात. पण त्यातील 80 टक्के लोक पक्षाला मत देतात.''

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान करण्यापूर्वी तेजस्वी सूर्या यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी पूजाही केली. बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने सूर्या यांच्याविरोधात सौम्या रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. X वरील पोस्टमध्ये तेजस्वी सूर्या यांनी मतदारांना भाजपच्या निवडणूक चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले होते.

ते म्हणाले होते की, "भाजप कर्नाटकच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा. कर्नाटकचे लोक राष्ट्रवादी आहेत. त्यांनी गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास पाहिला आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कमळाच्या बटणावर क्लिक करा आणि मोदीजींना एकदा निवडून द्या." लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज कर्नाटकातील 14 जागांवर मतदान पार पाडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast Update : बहि‍णीकडे जातो म्हणून निघाला अन् दिल्लीत पोहचला, बॉम्बस्फोटावेळी मशिदीत मुक्काम, अकोल्यात येताच....

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

पुण्यात अजित पवार गटाला जबरदस्त धक्का; स्थानिक नेतृत्वाला कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र करणार

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पेन्शधारकांना महागाई भत्ता मिळणार नाही? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Pune Accident: पुण्यात भयंकर रेल्वे अपघात, धावत्या ट्रेनने ३ तरुणांना चिरडलं

SCROLL FOR NEXT