MLA Sanjay Gaikwad Latest News  Saam TV
लोकसभा २०२४

Buldhana News: दुपारी अर्ज, संध्याकाळी उमेदवारी; बुलडाण्याची जागा शिवसेनेला कशी मिळाली, संजय गायकवाड यांनी सांगितली इनसाइड स्टोरी

Maharashtra Politics News: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय गायकवाड यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २९ मार्च २०२४

Buldhana Loksabha Constituency News:

बुलढाणा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय गायकवाड यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

बुलढाणा लोकसभेसाठी (Buldhana) विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची उमेदवारी घोषित झाली आहे. मात्र काल महायुतीतील शिवसेनेचेच आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह महायुतीत खळबळ उडाली होती. मात्र आज महायुतीच्या भव्य मेळाव्यातून संजय गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

"मी जेव्हा दुपारी अर्ज भरला तेव्हा सायंकाळी यादी जाहीर झाली व उमेदवारी शिवसेनेला मिळाली. मी दुपारी खासदारकीचा नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे, अशी स्पष्टता आमदार संजय गायकवाड यांनी केली. तसेच खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याचे आवाहनही संजय गायकवाड यांनी केले. त्यामुळे त्यांचा नामांकन अर्ज मागे घेतला जाईल हे स्पष्ट झाले आहे.

भाजप आमदारांनी फिरवली पाठ

दरम्यान, आज बुलढाण्यामध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तसेच भाजपाचे काही आमदार उपस्थित होते. मात्र भाजपचे आमदार श्वेता महाले आणि आमदार आकाश फुंडकर यांनी महायुतीच्या या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे बुलढाण्यामध्ये भाजप- शिवसेनेत असलेला अंतर्गत वाद समोर आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT