Narayan Rane Saam Tv
लोकसभा २०२४

Narayan Rane : भाजपकडून १३ वी यादी जाहीर; रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणेंना उमेदवारी

Narayan Rane lok sabha Election 2024 :रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी आज, गुरुवारी भाजपने जाहीर केली आहे.

Vishal Gangurde

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी आज, गुरुवारी भाजपने जाहीर केली आहे. आता नारायण राणे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून तिढा होता. या जागेसाठी शिंदे गट आग्रही होता. या जागेसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक होते. मात्र, आज उदय सामंत यांनी भाजपकडून नारायण राणेंना उमदेवारी जाहीर झाल्यास काम करू, असे स्पष्ट केले.

उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या जागेवरील दावा सोडला. त्यानंतर दुसरीकडे भाजपने १३ वी यादी समोर आली. या यादीत भाजपकडून नारायण राणे यांना रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी झाल्यानंतर या मतदारसंघात लढत स्पष्ट झाली आहे. या मतदारसंघात आता नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत पाहायला मिळणार आहे.

.भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कणकवलीतील त्यांच्या घराबाहेर फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला.

भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. नारायण राणे म्हणाले, 'आताच मी टीव्हीवर पाहतोय की, माझी उमेदवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी झाली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे. मी त्यांचा आभारी आहे. मी उद्या ११ वाजता माझा अर्ज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भरणार आहे'. तत्पूर्वी 'उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा द्यायचा ठरवलं, मी त्याचे स्वागत करतो. तसेच त्यांना धन्यवाद, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझं आता लग्न ठरलंय, रजा शिल्लक पाहिजे, तुम्ही पण...'; कोल्हापुरातील तरणाबांड पोलीस कर्मचाऱ्यानं पुण्यात आयुष्य संपवलं

Ayushman Card: आयुष्मान कार्ड वापरून तुम्हाला वर्षातून किती रुपयांचा मोफत उपचार मिळू शकतात?

Andheri Tourism: पावसाळ्यात लांब न जाता अंधेरीतील या हिरव्यागार ठिकाणी फिरून या; निसर्गाची मजा अनुभवायला मिळेल

Rishabh Pant : लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का; रिषभ पंतने मैदान सोडलं, कारण...

Nandurbar : झुलत्या पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, सरकार लक्ष देणार का? | VIDEO

SCROLL FOR NEXT