Uday Samant: किरण भैय्यांना खासदार करायचं आहे पण; नारायण राणेंना उमेदवारी मिळताच उदय सामंत थेट बोलले!

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha: किरण सामंत यांनी निवडणूकीतून माघार घेतली असून नारायण राणेंचे काम करु, असेही उदय सामंत यांनी दिले आहे.
ratnagiri -sindhudurg lok sabha constituency
Uday SamantSaam tv
Published On

सुरज मासूरकर, मुंबई|ता. १८ एप्रिल २०२४

सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चिच झाले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी घोषित केली असून त्यामध्ये रत्नागिरीमधून नारायण राणेंना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तत्पुर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

"गेले कित्येक दिवस तिकीट वाटपावर चर्चा सुरु आहे. किरण सामंत यांनी ट्विट केले होते की मोदींना पंतप्रधान होण्यासाठी मी माघार घेतो. उद्या फाॅर्म भरायची वेळ आली पण उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे किरण सामंत यांनी निर्णय घेतला की नारायण राणे यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तरी प्रमाणिक काम करु," असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

तसेच "महायुतीमध्ये कुठेही तिडा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. किरण सामंत यांचा पूर्ण पणे मानसन्मान महायुतीमध्ये केला जाईल. आमच्यात ताकद आहे. कोणतही आश्वासन न घेता त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. जर किरण भैय्यांनी भूमिका घेतली नसती तर आज काय उद्यापर्यंत नाव निश्चित झाले नसते. कार्यकर्त्यांध्ये नाराजी आहे पण ती आम्ही दुर करु," असे उदय सामंत यावेळी म्हणाले.

ratnagiri -sindhudurg lok sabha constituency
Satara Loksabha: साताऱ्यात आज उदयनराजे भोसलेंचे शक्तिप्रदर्शन! मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भरणार अर्ज

दरम्यान, नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. मागच्या दोन टर्मपासून विनायक राऊत हे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लक्षवेधी लढत होणार आहे.

ratnagiri -sindhudurg lok sabha constituency
Narayan Rane : भाजपकडून १३ वी यादी जाहीर; रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणेंना उमेदवारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com