Satara Loksabha: साताऱ्यात आज उदयनराजे भोसलेंचे शक्तिप्रदर्शन! मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भरणार अर्ज

Maharashtra Loksabha Election 2024: उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
Udayanraje Bhosale Exclusive
Udayanraje BhosaleSaam tv
Published On

सातारा, ता. १८ एप्रिल २०२४

सातारा लोकसभा मतदार संघातून आज छत्रपती उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) शशिकांत शिदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शशिकांत शिंदे यांच्याविरोधात भाजपने छत्रपती उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ११ वाजता गांधी मैदानातून भव्य रॅली काढली जाणार आहे.

Udayanraje Bhosale Exclusive
Maharashtra Election: बारामतीच्या मैदानात डाव प्रतिडाव! अजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला; काय आहे पवार-पाटील घराण्याचा संघर्ष?

सोलापुरात प्रणिती शिंदेंचे शक्तिप्रदर्शन..

सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी प्रणिती शिंदे यांच्याकडून भव्य रॅली काढण्यात येणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, चंद्रकांत हंडोरे या रॅलीत सहभागी होणार आहेत.

भरिरथ भालकेंचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा!

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र आणि बीआरएसचे नेते भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भालके यांच्या पाठिंब्याने शिंदे यांना मंगळवेढा , पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात मोठी ताकद मिळणार आहे.

Udayanraje Bhosale Exclusive
Amravati Water Supply : अमरावती आणि बडनेरा शहराला होणारा पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com