Maharashtra Election: बारामतीच्या मैदानात डाव प्रतिडाव! अजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला; काय आहे पवार-पाटील घराण्याचा संघर्ष?

Baramati Loksabha Election : काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी देखील प्रेमसुख कटारिया यांची दौंडमधील निवासस्थानी भेट घेतली होती.. अजित पवार यांनी दौंडमध्ये प्रेमसुख कटारिया यांचीही भेट घेतलीय. आता अजित पवार त्यांच्यातील आणि हर्षवर्धन पाटलांमधील दुरावा दूर करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Baramati Loksabha Election  Ajit Pawar Meeting
Baramati Loksabha Election Ajit Pawar Meeting

Baramati Loksabha Election Ajit Pawar Meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहेत. 19 एप्रिल रोजी ते सहकुटुंब हर्षवर्धन पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतीये. यावेळी जय पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवारदेखील उपस्थिती लावणार असल्याची माहिती मिळतीय. हर्षवर्धन पाटलांच्या इंदापुरातील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. त्यानंतर अजित पवार रात्री भाजप कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकमेकांविरोधात डाव टाकतायत. यातून नेमंक कुणाच्या हाती यश लागणार पाहुयात या रिपोर्टमधून.

बारामतीत पवार विरुद्ध पवार लढतीची चुरस चांगलीच वाढलीय. शरद पवारांनी अजित पवारांच्या राजकीय विरोधकांसोबत भेटीगाठी सुरु केला आहेत. अशातच अजित पवारांनीही प्रतिडाव टाकायला सुरुवात केलीय. अजित पवार चक्क हर्षवर्धन पाटील यांची सहकुटुंब भेट घेणार आहेत.हर्षवर्धन पाटलांसोबतचा मिटला असल्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठित घराण्यांमधील वाद नेहमीच चर्चेत राहिलाय. त्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील म्हणजे राजकारणातले कट्टर वैरी अशी दोघांची ओळख. नव्वदच्या दशकात शरद पवार आणि शंकरराव पाटलांपासून सुरू झालेला वाद आता तिसऱ्या पिढीनेही पुढे चालवला.

पवार- पाटील घराण्याचा संघर्ष

1991 मध्ये शरद पवारांनी शंकरराव पाटलांचं लोकसभेचं तिकीट कापून अजित पवारांना संधी दिली. इथूनच पवार-पाटील संघर्षाची ठिणगी पडली.

1994 मध्ये हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते. पण अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसनं तिकीट नाकारलं.

काँग्रेसविरोधात अपक्ष उभं राहून हर्षवर्धन पाटील झेडपीत विजयी झाले.

1995 मध्ये हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढू इच्छित होते. पण पुन्हा तिकीट कापल्यामुळे अपक्ष लढून विजयी झाले.

2014 आणि 2019मध्ये अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांविरोधात दत्ता भरणे यांना बळ दिलं आणि निवडून आणलं होतं.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी देखील प्रेमसुख कटारिया यांची दौंडमधील निवासस्थानी भेट घेतली होती.अजित पवार यांनी दौंडमध्ये प्रेमसुख कटारिया यांचीही भेट घेतलीय. सुनेत्रा पवार यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रेमसुख कटारिया यांच्याबरोबरची अजित पवारांची भेट महत्त्वाची मानली जातेय.

शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना आपल्या बाजुने केलं तर सुनेत्रा पवारांचा विजय अवघड आहे.. म्हणूनच अजित पवार हर्षवर्धन पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील. मात्र अजित पवारांना कंटाळून भाजपत आलेले हर्षवर्धन पाटील आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Baramati Loksabha Election  Ajit Pawar Meeting
Maharashtra Politics 2024 : शिर्डीत महाविकास आघाडीला मोठा धक्का; या मोठ्या नेत्याने सोडली साथ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com