Pm Modi and Amit Shah Saam tv
लोकसभा २०२४

Politics News : लोकसभेचा निकाल लागताच भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार; जे.पी नड्डा यांचा कार्यकाल संपणार

BJP News Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा याचा कार्यकाळ 6 जून रोजी संपणार आहे.

Satish Daud

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा याचा कार्यकाळ 6 जून रोजी संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमले जाणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

याआधी भाजपने जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून महिन्यापर्यंत वाढवला होता. आता निकालानंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय अध्यक्षामुळे महाराष्ट्र संघटनेतही मोठे फेरबदल होऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांच्या जागी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून शिवराज सिंह चौहान यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाऊ शकतं, असं सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलं आहे. यासोबत भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, नेमके हे बदल कोणते असणार? भाजप कोणते मोठे निर्णय घेणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपने एका विस्तारकाची नेमणूक केली होती. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ४८ लोकसभा विस्तारक आणि २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २८८ विधानसभा विस्तारक नेमले गेले होते. मात्र, ज्या पद्धतीने लोकसभेत काम व्हायला पाहिजे होते, त्या पद्धतीने काम झालं नसल्याचा अहवाल समोर आला आहे.

त्यामुळे लोकसभेची कामगिरी बघून विस्तारकांसंदर्भातला मोठा निर्णय घेतला जाणार आहे. सुमार कामगिरी असणाऱ्या विस्तारकांना थेट घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसून येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला १० ते १५ जागांवर नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Isha Malviya: स्टाइल जो दिल जीत ले! ईशा मालवीयाचा ट्रेंडी एथनिक लूक

मतदार यादीमध्ये बोगस नावं कोणी टाकली? आरोपानंतर आमदार गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

ट्रक थांबवला, चालकाची सटकली, ड्युटी बजावणाऱ्या पोलिसाला भररस्त्यात हाणलं; पुणे हादरलं

Jio Special Plan: मज्जा मज्जा! नेटफ्लिक्सवरील एकही वेबसिरीज नाही होणार मिस; जाणून घ्या जिओचा नवा प्लॅन काय?

Maharashtra Live News Update : - बळीराजाची दिवाळी शेतातच

SCROLL FOR NEXT