Amit Shah Saam Tv
लोकसभा २०२४

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठा दावा केला आहे. शहा म्हणाले की, 'पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला आधीच 310 जागा मिळाल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठा दावा केला आहे. शहा म्हणाले की, 'पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला आधीच 310 जागा मिळाल्या आहेत. सहाव्या आणि सातव्या फेरीच्या मतदानानंतर आम्हाला 400 हून अधिक जागा मिळतील.' ओडिशात प्रचार सभेत त्यांनी हा दावा केला आहे.

सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, यावेळी ओडिशात कमळ फुलणार आहे. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबलपूरमधून उमेदवारी दिली आहे.

राज्यात (ओडिशात ) मूठभर अधिकाऱ्यांची सत्ता असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. या निवडणुकीमुळे राज्यातील सध्याचे बाबूराज संपणार असल्याचे ते म्हणाले. देशातील बहुतांश खाणी आणि खनिज साठे केओंझार जिल्ह्यात असूनही येथील आदिवासींना कोणताही लाभ मिळालेला नाही, असं ते म्हणाले.

आधीच्या केंद्रातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले, 'काँग्रेसने आदिवासींसाठी काहीही केले नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आदिवासी प्रकरणांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले होते, तर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात नक्षलवाद संपवण्याचे काम केले आहे.

ते म्हणाले की, ''मोदींनी डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन स्थापन करून आदिवासी भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत. मोदी सरकारच्या काळात आदिवासींसाठी अर्थसंकल्पीय तरतूद 1.25 लाख कोटी रुपये करण्यात आली होती. तर आधीच्या यूपीए सरकारच्या काळात 25,000 कोटी रुपये देण्यात आले होते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Head Neck Cancer Symptoms: गिळताना त्रास होतोय? वेळीच व्हा सावध! डोकं अन् मानेच्या कॅन्सची असू शकतात लक्षणे

Railway Mega Block: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन दिवस पॉवर ब्लॉक; पनवेल-बेलापूर ट्रेन बंद; वेळापत्रक वाचा

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Laxmichya Paulanni : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट; ईशा केसकरची एक्झिट तर नवीन नायिकेची एन्ट्री, पाहा VIDEO

Cidco Homes : स्वस्तात मस्त! लॉटरी नाही थेट आवडीचे घर, ४५०८ घरे विक्रीसाठी निघाली, सरकारकडून ₹२५०००० ची सब्सिडी

SCROLL FOR NEXT