Devendra Fadnavis Explained Why BJP Defeat in Maharashtra Election 2024 Saam TV
लोकसभा २०२४

Devendra Fadnavis on Election: 'राज्यात भाजपला जनतेने नाकारलं नाही, तर...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पराभवाची कारणे

Devendra Fadanvis On Defeat In Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पराभवाची कारणे सांगितली आहेत.

Rohini Gudaghe

गणेश कवडे, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणुक २०२४ च्या निकालात राज्यात भाजपला चांगलाच दणका बसला आहे. राज्यात भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पराभवाची कारणे सांगितल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपने जनतेला नाकारलेलं नाही, तर समसमान मतं पडली आहेत.

राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. तर संविधान बदलनार या नरेटीव्हचा फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर कांदा प्रश्नाचा देखील परिणाम झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे भाजपला फटका सहन करावा लागला आहे. काही ठिकाणी कांद्याचा, तर काही ठिकाणी सोयाबीन आणि कापूसचा देखील प्रश्न होता. संविधान बदलणार, ही सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात कमी पडल्याचं फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकांचे काल निकाल आले. देशभरातील भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांचे देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले आहेत. पंडित नेहरूनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याचा मोदींना आशीर्वाद दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आडिसामध्ये पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वात सरकार बनणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं (Lok Sabha Election 2024 Result) आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील एक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

इंडीया आघाडीपेक्षा जास्त जागा (Lok Sabha Election 2024) भाजपला मिळालेल्या आहेत. भाजप आणि एनडीए घटक पक्ष मिळून सरकार बनणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचंही स्वागत फडणवीसांनी केलं आहे. महाविकास आघाडीला राज्यात 2 लाख मते जास्त मिळाल्याचं फडणवीस म्हटले आहेत. माझी जबाबदारी आहे, मी कुठेतरी कमी पडलो असं म्हणत फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

New Income Tax Bill: नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, करदात्यांसाठी केले महत्त्वाचे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Success Story: 12वी फेल, २ वर्षे दूध विकले, मोठ्या जिद्दीने केली UPSC क्रॅक; नाशिकच्या लेकाची यशोगाथा

Asim Munir : ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडूक उड्या;पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला, VIDEO

SCROLL FOR NEXT