Sujat Ambedkar On BJP And Congress:
>> भरत नागणे
पुन्हा देशात सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये छुपा समझौता झाला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला.
माढा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारस्कर यांच्या प्रचारार्थ आज सांगोल्यात जाहीर सभा झाली. सभेनंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस व भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपकडून संविधानाचे उल्लंघन होत आहे. वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा देखील संविधानाच्या विरोधात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. भाजप हे संविधानाच्या विरोधात काम करतय आणि ते करत राहिलं, असं वाटतं. ते रोखण्यासाठी वंचित सारखा एक सक्षम पर्याय उभा करावा लागेल. काँग्रेसकडून गेल्या सत्तर वर्षात संविधानाचा पाया आणि ढाचा मजबूत करण्यासाठी काही केले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी एमआयएमवार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, ''गेल्या वेळी येथील एमआयएमने वंचितच्या पाठीत खंजीर खूपसला. आमच्या मतावर निवडून आले.''
ते म्हणाले, ''युती केल्यानंतर युतीचा धर्म निभाव लागत असतो. हे जमत नसेल तर युत्या करू नका. मग ते असदुद्दीन ओवेसी असेल किंवा ईतर कोणी असेल.'' प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर उपकार आहेत, म्हणून मी वेळ प्रसगी त्यांच्या पाठीशी उभा राहीन, पाहिजे ती मदत करणार, ही राजकारणाची नादी आहे. मोदी सांगत सुटलेले आहेत काळजी करू नका, उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, हे संकेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.