लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. सध्या इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. अशाच बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपावर इंडिया आघाडीने शिक्कामोर्तब केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इंडिया आघाडीसाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि त्यापाठोपाठ बिहार महत्वाचे राज्य आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) एकूण ४० जागा आहेत. मागील काही दिवसांपासून बिहारमधील जागावाटपावरून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु होती.
त्यामुळे बिहारमधील महागठबंधन नक्कीच तुटणार, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा सर्वांना एकत्र करत जागावाटपावर तोडगा काढला. यानंतर बिहारमधील महागठबंधनचे जागावाटप जाहीर करण्यात आले.
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष ४० पैकी २६ जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेसच्या ९ जागांवरुन आपले उमेदवार रिंगणार उतरवणार आहे. याशिवाय डाव्या पक्षाला वाट्याला ५ जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेसच्या वाट्याला किसनगंजसह कटिहार, भागलपूर, मुझफ्परपूर, समस्तीपूर, पश्चिम चंपारण, सासाराम, महाराजगंज आणि पटना साहिब हे ९ मतदारसंघ आले आहेत. तर डाव्यांना बेगुसराई, खगरिया, कराकट, नालंदा आणि आरा या जागा मिळाल्या आहेत. उर्वरित २६ जागांवर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार असणार आहेत.
दुसरीकडे एनडीएने बिहारमधील जागावाटप आधीच जाहीर केले आहे. भाजप १७ जागांवर, तर जेडीयू १६ जागांवर निवडणूक लढणार आहे. लोक जनशक्तीला ५ जागा देण्यात आल्या आहेत. दोन जागा इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.