Bhiwandi Lok Sabha Election Result Saam Digital
लोकसभा २०२४

Bhiwandi Lok Sabha Election Result: भिवंडीत 'बाळ्या मामां'नी उधळला गुलाल; भाजपच्या कपिल पाटील यांचा ६६, १२१ मतांनी केला पराभव

Suresh Mhatre (Balya Mama) Win In Bhiwandi Lok Sabha Election : भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा विजय झाले आहेत. भाजपच्या कपिल पाटील यांचा त्यांनी ६६, १२१ मतांनी पराभव केला आहे.

Sandeep Gawade

भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा पराभव केला आहे. कपिल पाटील सलग दोन वेळा खासदार होते आणि यावेळी ते हॅट्रिक करतील असा विश्वास भाजला होता. मात्र बाळ्या मामांनी भाजपच्या आत्मविश्वासाला सुरूंग लावत मोठा विजय मिळवला आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुरेश म्हात्रेंनी ६६, १२१ मतांनी कपिल पाटील यांचा पराभव केला आहे. शरद पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि समस्त भिवंडीकरांनी तो सार्थ करून दाखवला, असं मत त्यांनी निकालानंतर व्यक्त केलं आहे. जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरून चुरस निर्माण केली होती. मात्र सुरेश म्हात्रे यांना सुरुवातीपासूनच आघाडी मिळाली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली आणि मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला. कपिल पाटील केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यामुळे बाळ्या मामांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी भिवंडीत मतदान पार पडलं होतं. मागील 2019 च्या तुलनेत यावेळेस मतांमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे या मतांचा कोणाला फायदा होणार याकडे लक्ष लागलं होतं. एकूण 56.41% मतदान झाल्याचं आकडेवारी समोर आली होती. निकालाअंती या मतांचा सुरेश म्हात्रेंना फायदा झाल्याच दिसून आलं आहे.

कपिल पाटील यांनी २019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या केशव तावरे यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. त्यावेळी कपिल पाटील यांना ५, 23००० हजार मतं मिळाली होती. तर केशव तावरे यांना ३, 67,००० मतं मिळाली होती. भिवंडीसह शहापूर, मुरबाड, कल्याण चा समावेश या मतदार संगात होतो. या मतदासंघात मुस्लीम मतदारांची संख्या २१ टक्के आहे. ही मतं निर्णाय ठरणार अशी चर्चा होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT