Udayanraje Bhosale On Pankaja Munde Saam Tv
लोकसभा २०२४

Udayanraje Bhosale: निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईल, पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे जनतेसमोर नतमस्तक

Udayanraje Bhosale On Pankaja Munde: पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी बीडकरांना केले आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Priya More

विनोद जिरे, बीड

'पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही, तिला निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईल.', असे वक्तव्य भाजपचे नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी बीडकरांना केले आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, मी मनापासून सांगतो पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही, तिला जर निवडून दिलं नाही, तर मी राजीनामा देईल आणि पंकजाला माझ्या तिथून निवडून आणेन हे लक्षात ठेवा. पण तसं होत नाही. मी येतांना बघत होतो. चोहो बाजूंनी कंपाऊंडला कुलूप लावतो. हो म्हणालात तर सोडतो. नाहीतर नाही सोडत.', असे म्हणत उदयनराजेंनी बीडकरांना पंकजा मुंडेंना मतदान करण्याचे आवाहन केले.

'एका जीवाभावाच्या व्यक्तीला मदत करायची की नाही. तिला संधी मिळाली पाहिजे की नाही? ती काळ्याची पांढरी झाल्यानंतर तिला संधी मिळणार का?', असा सवाल उदयनराजे यांनी बीडकरांना केला. तसंच, 'मी कुणाचे कौतुक करायला आलो नाही. महाराजांचे नाव घेऊन ते विकास करत आहेत. गरिबी हटाव म्हणून काम करत आहेत.', असे देखील त्यांनी सांगितले.

तसंच, 'एक सांगतो कृपा करा, माझ्या बहिणीला निवडून द्या. तलवार उपसा आता. मी आलो हिच्याकरता नीट वागा. आता वाकून नमस्कार करतो तुम्हाला. तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय.' असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उदयनराजे भोसले बीडकरांसमोर नतमस्तक झाले. तसंच भावुक होत त्यांनी तुम्ही पंकजाला निवडून देणार ना?, असा सवाल केला. यासोबतच, 'तिला निवडून देणार का? मी माझ्याजाग्यावर तिला निवडून आणतो. मग बघतो तुमच्याकडे.', असे म्हणत त्यांनी बीडकरांना दम दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT