Asaduddin Owaisi and Prakash Ambedkar Saam Tv
लोकसभा २०२४

Sambhajinaga Lok Sabha: प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी पुन्हा एकत्र येणार? संभाजीनगरच्या जागेसाठी एमआयएमची खेळी?

Asaduddin Owaisi and Prakash Ambedkar News: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी संभाजीनगरच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची मोठी घोषणा केलीय. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा, द्या असं जाहीर आवाहन औवेसींनी केलंय.

साम टिव्ही ब्युरो

Sambhajinaga Lok Sabha:

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी संभाजीनगरच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची मोठी घोषणा केलीय. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा, द्या असं जाहीर आवाहन औवेसींनी केलंय. दरम्यान या घोषणेमुळे पुन्हा एकद आंबेडकर आणि औवेसींच्या युती होणार असल्याची चर्चा रंगलीय.

ज्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर 'एमआयएम'चा महाराष्ट्रातील एकमेव खासदार संभाजीनगरमधून निवडून आला. त्याच संभाजीनगरात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी एक आश्चर्यकारक भूमिका जाहीर केलीय. ओवैसींनी अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

ओवैसींच्या या घोषणेमुळे वंचित आणि एमआयएमची पुन्हा युती होणार का अशी चर्चा रंगलीय. 2019च्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि एमआयएमची युती एक तिसरी ताकद म्हणून समोर आली होती.. याच युतीचा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला जोरदार फटका बसला होता.

वंचित-एमआयएम युती का तुटली?

साधारण 8 ते 9 जागांवर वंचितच्या मतांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयापासून दूर ठेवलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 7 महिन्यातच वंचित-एमआयएमची युती तुटली. विधानसभेच्या जागावाटपावरून खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितवर गंभीर आरोप केले होते. 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडल्या जात असल्याचं जलील यांनी म्हटलं होतं. जलील यांनी प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसशी संबंध असल्याची घणाघाती टीकाही केली होती. तर इम्तियाज जलील भाजपसाठी अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांनी युती तुटल्याचं खापर जलील यांच्यावर फोडलं होतं.

नेमकं निवडणुकीच्या तोंडावर जलील यांचं 'वंचित'प्रेम पुन्हा उफाळून आलंय..

गेल्या निवडणुकीत मिळालेली दलित समाजाची मतं दुरावू नये म्हणून इम्तियाज जलील यांनी स्मार्ट खेळी केल्याचं दिसतंय. प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमकडे पाठिंब्याची कुठलीही मागणी केली नव्हती. आता जलील यांनी देऊ केलेला पाठिंबा वंचित बहुजन आघाडी स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन महिन्यापूर्वी कशेडी घाटात तिघांनी संपवलं, मृतदेहाचं गुढ उकललं; रायगडमधील 'त्या' हत्येचं धक्कादायक कारण

Mira Bhayandar : मारहाणीनंतर जीवे मारण्याचा धमक्या, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं? मिरारोडमधील मनसैनिकाने सगळंच सांगितलं

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदर मोर्चा का निघाला? अविनाश जाधव यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला | VIDEO

Divorce: '३ दिवस एकच अंडरवेअर घालतोस, आंघोळ करत नाहीस...मला काडीमोड हवाय' पत्नीचं डिव्हॉर्स लेटर व्हायरल

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT