Arunachal Pradesh And Sikkim Assembly Election Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल, 2 जूनला जाहीर होणार निकाल; काय आहे कारण?

Arunachal Pradesh News: अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या दोन राज्यांतील मतमोजणी ४ जूनला होणार नसून २ जूनला होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

Satish Kengar

Arunachal Pradesh And Sikkim Assembly Election:

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या दोन राज्यांतील मतमोजणी ४ जूनला होणार नसून २ जूनला होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही एकाच टप्प्यात १९ एप्रिलला होणार आहेत.

अरुणाचलचे मुख्य निवडणूक अधिकारी पवन कुमार सैन यांनी सांगितले की, उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मार्च आहे. तर उमेदवारी अर्जांची छाननी २८ मार्च रोजी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्च आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पवन कुमार सैन म्हणाले की, ५ जानेवारी २०२४ पर्यंत राज्यातील एकूण मतदारांची संख्या ८,८२,८१६ आहे. त्यापैकी ४,३३,७६० पुरुष आणि ४,४९,०५० महिला आहेत. ते म्हणाले, राज्यभरात २,२२६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. (Latest Marathi News)

सिक्कीममध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका १९ एप्रिल रोजी एकाच वेळी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने शनिवारी केली होती. या हिमालयीन राज्यात लोकसभेची फक्त एक जागा आणि विधानसभेच्या ३२ जागा आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल.

त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च असून २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्च असल्याचे आयोगाने म्हटले आहे. निवडणुकीत सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचा (SKM) सामना सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) सोबत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यातील तलावात १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

मुंबईत दहीहंडी सरावात बाल गोविंदाचा मृत्यू, थर लावताना कोसळला, परिसरात शोककळा

Nashik Crime : रक्षाबंधनानिमित्ताने कुटुंब गावी; बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

Coolie Advance Booking Collection: रजनीकांत यांच्या 'कुली'चा बोलबाला; पहिल्या दिवशी करणार इतक्या कोटींच कलेक्शन

SCROLL FOR NEXT