Amravati News
Amravati News  Saam Tv
लोकसभा २०२४

Amravati Politics : 'आता करेक्ट कार्यक्रम होईल', बच्चू कडूंनी नवनीत राणांंविरोधात फडकावलं बंडाचं निशाण

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे | अमरावती

Bacchu Kadu News :

भाजपने अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या निर्णयाला काही तास उलटत नाहीत तोच बच्चू कडू यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. बच्चू कडू कोणत्याही क्षणी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता करेक्ट कार्यक्रम होईल, नवनीत राणांच्या विरोधात बंडखोरी करू आणि राणांना पाडू, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने बच्चू कडू यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राणा विरुद्ध कडू सामना होण्याची शक्यता आहे. मात्र येत्या चार तारखेला राणा-कडू वादावर शिंदे आणि फडणवीसांसोबत बच्चू कडूंची बैठक होणार होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता या बैठकीला देखील बच्चू कडू जाणार नसल्याने हा वाद क्षमण्याची शक्यता कमी आहे. आमदार बच्चू कडू कोणत्याही क्षणी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आता कोणाशीही बैठक होणार नाही. आता बैठकीचे विषय संपले. आता डायरेक्ट कार्यक्रम होईल आणि करेक्ट कार्यक्रम होईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

आम्ही महायुतीत मैत्रिपूर्व निवडणूक लढू. नवनीत राणांच्या विरोधात बंडखोरी करू आणि राणांना पाडू. महायुतीने सोबत ठेवलं नाही तर कोत्याक्षणी महायुतीतून बाहेर पडू, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

रवी राणा यांनी भाजपचं कार्यायल फोडलं होतं. त्याच रवी राणांच्या पत्नीचा प्रचार भाजप कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे, ही लाचारी आहे. मला भाजपच्या कार्यकर्त्यांचं वाईट वाटतंय, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.

आधीच आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांच्या भूमिकेमुळे महायुतीत रस्सीखेच सुरु होती. त्यात आता बच्चू कडू बंडाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे नवनीत राणांना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : फोटो व्हायरल करायची धमकी देत मुलीवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

Sharad Pawar: राज्यात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला!

Ajit Pawar News : 'शरद पवारांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती; अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Today's Marathi News Live : महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ CM शिंदेंचा रोड शो

Saam Impact : 'साम'च्या बातमीचा दणका! प्रशासन खडबडून जागं, 15 फेरीवाल्यांवर BMCची कारवाई!

SCROLL FOR NEXT