Amravati Constituency Saam TV
लोकसभा २०२४

Amravati Constituency : वंचित'च्या खेळीमुळे अमरावतीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट; लोकसभेत नाट्यपूर्ण घडामोडी

Lok Sabha Election : 'वंचित'च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्याबाबतचे पत्र गुरुवारी जारी केले. तरी देखील खुद्द आनंदराज आंबेडकरांनीच आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याबाबतचे पत्र बुधवारीच जाहीर केले होते.

Ruchika Jadhav

अमर घटारे

Amravati :

अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) दमदार उमेदवार राहील, असे चित्र निवडणूक जाहीर होण्यापूर्वी निर्माण करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशी 'वंचित'च्या उमेदवाराने अर्ज भरला नाही. त्यामुळे अनेकांना धक्का बसला.

प्रकाश आंबेडकर यांनी प्राजक्ता पिल्लेवान यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्याच उमेदवाराला 'वंचित'ने नाकारले असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे अमरावती लोकसभेत वंचितची माघार दिसली.

तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी २ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. आपल्याला वंचितचा पाठिंबा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र वंचितडून पाठिंबा मिळत नसल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. 

पंरतू काल 'वंचित'च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्याबाबतचे पत्र जारी केले आणि प्राजक्ता पिल्लेवान यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तरी देखील खुद्द आनंदराज आंबेडकरांनीच आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याबाबतचे पत्र याआधी बुधवारीच जाहीर केले.

यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. लोकसभेसाठी 'वंचित'ची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र नवीन चेहरा असलेल्या प्राजक्ता पिल्लेवान यांना अमरावतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे स्पर्धेतील इच्छुकांना धक्का बसला.

परंतु आता पिल्लेवान यांची उमेदवारी वंचितने नाकारलीये. 'वंचित'च्या या खेळीमुळे अमरावतीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमरावती लोकसभा मदतारसंघात भाजपचे कमळ आणि काँग्रेसचा पंजा यांच्यात मोठी लढत दिसणार आहे. काँग्रेसचे बळवंत वानखडेंविरुद्ध भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यात थेट लढत होईल. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिनेश बुब आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. या सर्वांमध्ये वंचितचा उमेदवार बाद झाल्याने अमरावतीच्या राजकारणात काय ट्वीस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT