Shirur Lok Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Shirur Lok Sabha: अमोल कोल्हे दादांना धक्का देणार? आढळराव पाटलांचा विजयाचा मार्ग खडतर?

Amol Kolhe: बारामतीनंतर अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा पराभव करायचा हे जाहीर करून शिरूर लोकसभा प्रतिष्ठेची केली होती. मात्र प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार कोल्हे शिरूरचा गड राखण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टिव्ही, प्रतिनिधी

बारामतीनंतर दोन्ही पवारांनी शिरूर लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली होती. याच शिरूरमधून अजित पवारांनी थेट अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा इशाराच दिला होता. मात्र शिरूरमधून अमोल कोल्हे अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना धोबीपछाड देणार असल्याचा अंदाज पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलाय. त्यामुळे अजित पवार गटाचे धाबे दणाणलेत.

राष्ट्रवादीतील फूटीनंतर अमोल कोल्हेंनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार चांगलेच भडकले. त्यांनी थेट शिरूरमधून अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करण्याचा इशाराच दिलाय. निवडणूक प्रचारात अजित पवार म्हणले होते की, आज तुला सांगतो. मी दिलेला उमेदवार निवडणूच आणून दाखवीन.

अजित पवार यांनी शिरूर जिंकण्यासाठी मोठा डाव टाकत शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच हातावर घड्याळ बांधत मैदानात उतरवलं. एवढंच नव्हे तर बारामतीचं मतदान झाल्यानंतर अजित पवारांनी शिरूरमध्ये ठाण मांडलं होतं.

मात्र अढळरावांचा विजयाचा मार्ग खडतर असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे आढळराव पाटलांचा पराभव झाला तर हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असणार आहे. मात्र निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागले, हे ४ जून रोजीच समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT