Maharashtra Exit Polls 2024: एक्झिट पोलचा कौल मविआला, भाजपला फोडाफोडीचा फटका? शिंदे, अजित पवार सोबत असूनही 45+ नाहीच?

Lok Sabha Election 2024 Result: एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीच्या 45 प्लसच्या ना-याला सुरूंग लागणार आहे. याला भाजपचं फोडाफोडीचं राजकारण जाबाबदार असल्याचा सूर उमटू लागलाय.
एक्झिट पोलचा कौल मविआला, भाजपला फोडाफोडीचा फटका? शिंदे, अजित पवार सोबत असूनही 45+ नाहीच?
Maharashtra Exit Polls 2024Saam tv

गिरीश निकम, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा राजकीय संघर्ष दिसून आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंड झाल्यानं जनतेचा कौल काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. निकालाआधी एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात मविआला 21 जागा मिळतील तर महायुतीला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकाच जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमिवर फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही? असा सूर उमटतोय.

अनेक एक्झीट पोलमधे महाराष्ट्रात महायुतीला फटका बसणार असा अंदाज आहे. फोडाफोडीचं राजकारण भाजपासाठी धोक्याची घंटा आहे अशी चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसेंनीही घरचा आहेर दिला आहे. जनतेला फोडाफोडीचं राजकारण पटलेलं नाही. महायुतीनं आत्मचिंतन करावं, असं खडसेंनी म्हटलंय.

एक्झिट पोलचा कौल मविआला, भाजपला फोडाफोडीचा फटका? शिंदे, अजित पवार सोबत असूनही 45+ नाहीच?
Lok Sabha Election: इंडिया आघाडीनंतर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, केल्या 4 महत्त्वाच्या मागण्या

काँग्रेसला 6 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज खरा ठरला तर त्याची कामगिरी चांगली मानली जाईल. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या वाढू शकते. दरम्यान, पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत विरोधी पक्ष नेते विजय वडट्टेवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय.

कोणी किती जागांवर निवडणूक लढवली?

महाराष्ट्रात भाजपने 28, शिंदे गटानं 15 आणि अजित गटानं 4 जागांवर निवडणूक लढवली होती. मविआत ठाकरे गटानं सर्वाधिक 21 जागा लढवल्या. काँग्रेसने 17 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर निवडणूक लढवली होती.

एक्झिट पोलचा कौल मविआला, भाजपला फोडाफोडीचा फटका? शिंदे, अजित पवार सोबत असूनही 45+ नाहीच?
EVMपूर्वी पोस्टल मतांची मोजणी करा, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

दोन महत्वाच्या पक्षांमध्ये फूट पडल्यानं लोकसभेची निवडणूक ख-या अर्थानं अत्यंत चुरशीची झाली. शिंदे आणि अजित गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपनं 45 प्लसचा नारा दिला होता. मात्र फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नसल्यामुळेच भाजपला झटका बसणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त झालाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com