Amit Shah addresses public meeting in Jalna Saam Tv
लोकसभा २०२४

Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Jalna News: आज भाजपचे ज्येष्ठ अमित शाह यांची जालना येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. अमित शाह यांनी खिचडी घोटाळा, कलम 370 आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

>> रामू ढाकणे

आज भाजपचे ज्येष्ठ अमित शाह यांची जालना येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. अमित शाह यांनी खिचडी घोटाळा, कलम 370 आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित शाह म्हणाले की, ''उद्धव ठाकरे यांचे सहकारी कोरोनाच्या काळात खिचडी घोटाळा करून मलाई खाण्याचे काम करत होते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांचा जीवन वाचवण्याचं काम करत होते.''

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे दोन दिवसानंतर संभाजीनगरला येत आहे. तुम्ही त्यांना विचारा त्यांनी संभाजीनगरच्या नावाला विरोध केला, त्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी का गेले.

इंडिया आघाडीवर टीका करत ते म्हणाले, ''हे जर सत्तेमध्ये आले तर राम मंदिरावर सुद्धा बाबरी मशिद नावाचे टाळ लागण्याचे काँग्रेस पक्ष करू शकतो.''

शाह म्हणाले की, ''इंडिया घडीकडे ना नेता आहे, ना नीती आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडे दहा वर्षात केलेल्या कामाचा हिशोब आहे. मोदी यांना तिसऱ्या वेळेस प्रधानमंत्री बनवण्याचा अर्थ आहे की, प्रत्येक क्षेत्रात भारताला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाणं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT