PM Modi Public Meeting in Maharashtra Saam Tv
लोकसभा २०२४

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

Narendra modi Ahmednagar speech: आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगरमध्ये सभा पार पडली.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi Public Meeting in Maharashtra:

आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगरमध्ये सभा पार पडली. यासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. तसेच 26/11 उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

अहमदनगर येथील सभेत बोलताना ते म्हणाले की, ''मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला महाराष्ट्राच्या भूमीवर पाकिस्तानने घडवून आणला होता की नाही? आपले जवान कोणामुळे शहीद झाले, आपल्या निष्पाप लोकांची हत्या कोणी केली? हे सत्य जगाला माहीत आहे. आपल्या देशाच्या न्यायालयांनी निकाल दिला आहे, पाकिस्ताननेही तो मान्य केला आहे, पण काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देत आहे.''

ते म्हणाले, ''हा मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्व निष्पाप नागरिकांचा अपमान आहे. मुंबई हल्ल्यात सर्व दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या सर्व सुरक्षा दलांचा हा अपमान आहे, हा तुकाराम ओंबळे सारख्या हुतात्म्यांचा अपमान आहे.''

मोदी म्हणाले, ''इंडिया आघाडीचे जनतेसमोर काहीही चालत नाही आहे. ही निराशा सीमेपलीकडेही दिसून येत आहे. येथील ए टीम पराभूत होत असल्याने काँग्रेसची सीमा ओलांडून बी टीम सक्रिय झाली आहे. काँग्रेसला प्रोत्साहन देण्यासाठी सीमेपलीकडून ट्वीट केले जात आहेत. त्याबदल्यात काँग्रेस दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानला क्लीन चिट देत आहे.''

काँग्रेस जाहीरनाम्यांवर भाष्य करताना ते म्हणाले, ''काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. एनडीए आणि काँग्रेसचे मुद्दे आणि अजेंडा यातील फरक तुम्हीच पाहा. आमचे लक्ष भारताचा विकास, कल्याण, सुरक्षा आणि सन्मान यावर आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे या मुद्द्यांवर चर्चा करण्यासारखे काही नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलैचे १५०० आले नाहीत? ही ७ कारणे असू शकतात

SCROLL FOR NEXT