CM Eknath Shinde on Uddhav Thackeray Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: 'सूरतला गेल्यावर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर', एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray: सूरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Satish Kengar

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray:

सूरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्रिपदाची ऑफर स्वीकारली नाही, म्हणून ठाकरे यांनी भाजप नेत्यांना फोन केल्याचंही शिंदे आपल्या मुलाखतीदरम्यान म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, मविआ सरकारच्या काळात अनेक भाजप नेत्यांना अटक करण्याचा डाव होता.

Times Of India या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप केला आहे की,''मविआ सरकारचा देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना अटक करण्याचा डाव होता.''

उद्धव ठाकरे यांनी तुमच्यात वाद कधी झाला, असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की,'' त्यांनी मला वर्षाला बोलावून तासनतास थांबायला लावलं. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मला बाहेर ठेवण्यात आले. माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा त्यांचा डाव होता. नक्षलवाद्यांकडून धमकी असूनही त्यांनी मला झेड प्लस सुरक्षा दिली नाही.''

ते म्हणाले, ''त्याआधीही मी त्यांना अनेकवेळा सांगितले होते की, आम्ही युती करून निवडणूक लढवली असल्याने आम्ही पुन्हा भाजपमध्ये जावे. खरे तर उद्धव यांनी त्याला हो म्हटले होते. मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि आठ दिवसांत निर्णय घेण्यास सांगितले. मात्र त्यांनी निर्णय घेण्याऐवजी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.''

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मात्र मविआ नेत्यांची मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून आग्रह धरला होता. यामुळे मविआ सरकार स्थापन व्हावं म्हणून मी मजबुरीत मुख्यमंत्री झालो. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,''उद्धव ठाकरेंना नेहमीच मुख्यमंत्री व्हायचे होते. हे त्याचे स्वप्न होते. ज्या दिवशी 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्या दिवशी त्यांनी दावा केला की, त्यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री व्हायचे होते आणि मुख्यमंत्रीपद ठाकरे कुटुंबाकडेच ठेवायचे होते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

SCROLL FOR NEXT