9 villages demanded water from nira or else will not cast vote to bjp madha constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Nira Dam Water : लोकसभा निवडणुकीत नीरेचा पाणीप्रश्न पेटला!; पंढरपूरच्या 9 गावांतील शेतकऱ्यांचा भाजपला थेट इशारा

Madha Lok Sabha Election : माढा मतदारसंघातील नऊ गावांना नीरा उजवा कालव्यातून तीन डी या फाट्याद्वारे शेतीसाठी पाणी दिले जाते. मात्र यावर्षी तीव्र उन्हाळा असतानाही अद्याप पाणी मिळाले नाही.

भारत नागणे

नीरा उजवा कालव्यातून दोन दिवसात पाणी द्यावे अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात मतदान करू असा थेट इशारा माढा लोकसभा मतदारसंघातील नऊ गावातील शेतकऱ्यांनी भाजपला दिला आहे. शेतक-यांच्या या इशा-यामुळे राजकीय वर्तुळात विशेषत: भाजपात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

नीरेच्या पाण्या संदर्भात आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे माढा लोकसभा मतदारसंघातील सोनके, तिसंगी, पळशी, उपरी भंडीशेगाव, खेड भाळवणी यासह नऊ गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पाण्याच्या विषयावरुन ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

माढा मतदारसंघातील नऊ गावांना नीरा उजवा कालव्यातून तीन डी या फाट्याद्वारे शेतीसाठी पाणी दिले जाते. मात्र यावर्षी तीव्र उन्हाळा असतानाही अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे या भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या दोन दिवसात नीरेचे पाणी द्या अन्यथा भाजपा उमेदवाराच्या विरोधात मतदान करू असा निर्धार ग्रामस्थांनी केला. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. यावर आता पाटबंधारे विभागाचे अधिकारी काय निर्णय घेतात याकडेच लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

SCROLL FOR NEXT