Lok Sabha Election First Phase Voting  Saam tv
लोकसभा २०२४

First Phase Voting: पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७७.५७ टक्के मतदान, महाराष्ट्रात किती? जाणून घ्या कुठे आणि किती मतदान झाले

Lok Sabha Election First Phase Voting : देशात लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंपर मतदान झाले.

Pramod Subhash Jagtap

Lok Sabha Election First Phase Voting :

देशात लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंपर मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के आणि महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान झाले. यातच कुठे किती टक्के मतदान झालं आहे, हा जाणून घेऊ...

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटीहून अधिक मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या ८.४ कोटी तर महिला मतदारांची संख्या ८.२३ कोटी आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ३५.६७ लाख आहे. २० ते २९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या ३.५१ कोटी आहे. १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदान पार पडले आहेत.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

महाराष्ट्र: ५४.८५ टक्के

पश्चिम बंगाल: ७७.५७ टक्के

त्रिपुरा: ७६.१० टक्के

पुडुचेरी: ७२.८४ टक्के

आसाम: ७०.७७ टक्के

अरुणाचल प्रदेश: ६३.२६ टक्के

अंदमान आणि निकोबार: ५६.८७ टक्के

बिहार: ४६.३२ टक्के

उत्तर प्रदेश: ५७.५४ टक्के

उत्तराखंड: ५३.५६ टक्के

छत्तीसगड: ६३.४१ टक्के

जम्मू आणि काश्मीर: ६५.०८ टक्के

लक्षद्वीप: ५९.०२ टक्के

मध्य प्रदेश: ६३.२५ टक्के

मणिपूर: ६७.४६ टक्के

मेघालय: ६९.९१ टक्के

मिझोरम: ५२.६२ टक्के

नागालँड: ५५.७५ टक्के

राजस्थान: ५०.२७ टक्के

सिक्कीम: ६७.५८ टक्के

तामिळनाडू: ६२.०२ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT