Election Commission of India Saam Tv
लोकसभा २०२४

Sixth Phase Polling: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 63.37 टक्के मतदान, निवडणूक आयोगाने जाहीर केली आकडेवारी

Lok Sabha elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केली आहे. सहाव्या टप्प्यात 63.37 टक्के मतदान झालं आहे.

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाची फायनल आकडेवारी जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या टप्प्यात एकूण 63.37 टक्के मतदान झाले. यामध्ये 61.95 टक्के पुरुष, 64.95 टक्के महिला आणि 18.67 टक्के तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 63.37 टक्के मतदान झाले असून, 11.13 कोटी पात्र मतदारांपैकी 7.05 कोटी मतदारांनी त्यांच्या मताधिकाराचा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या सहा टप्प्यात 87.54 कोटी मतदारांपैकी 57.77 कोटी मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. भारतामध्ये जगातील सर्वात जास्त मतदार 96.88 कोटी आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी झालेल्या मतदानाच्या पाचव्या टप्प्यात 62.2 टक्के मतदान झाले होते. चौथ्या टप्प्यात 69.16 टक्के मतदान झाले, जे 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या याच टप्प्यापेक्षा 3.65 टक्के जास्त आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा आकडा 65.68 टक्के होता. 2019 निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 68.4 टक्के मतदान झाले होते.

तसेच 2024 च्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाले, तर 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात 69.64 टक्के मतदान झाले. सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 69.43 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या फेरीत 25 मे रोजी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांवर मतदान झाले. यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. जिथे मतदान तिसऱ्या टप्प्याऐवजी सहाव्या टप्प्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी, निरहुआ, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि मनोहर लाल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य या टप्प्यात ईव्हीएममध्ये कैद झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, अडचणींवर मात करत केली MPSC क्रॅक; सोलापूरच्या शेतकऱ्याची लेक झाली सरकारी अधिकारी

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Crime news India: IRS ऑफिसरच्या मुलीची हत्या; आधी लैंगिक अत्याचार, नंतर मोबाइलच्या चार्जरने गळा आवळला

Long Hair Hairstyles: लांब केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअरस्टाईल्स कोणत्या?

SCROLL FOR NEXT