- मंगेश भांडेकर
गडचिरोली जिल्ह्यात येत्या 19 एप्रिलला लाेकसभा निवडणुकीसाठी मतदान घेतले जाणार आहे. निवडणुक आयाेगाने लाेकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी जास्ती जास्त मतदान व्हावे म्हणून यंदा ज्येष्ठ नागरिक (वय वर्ष 85 पुढे), मतदान केंद्रापर्यंत जाऊ न शकणारे नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचा लाभ गडचिराेली चिमूर लाेकसभा मतदारसंघात (gadchiroli chimur lok sabha election 2024) आतापर्यंत 165 मतदारांनी घेतला. या मतदारांनी घरातून त्यांची मतदानाची प्रक्रिया पार पाडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गाेंदिया, गडचिराेली-चिमूर तसेच चंद्रपूर लाेकसभा मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. निवडणुक आयाेगाने गडचिरोली लोकसभा मतदारसंघात बुधवारी गृह मतदानाची प्रक्रियेस प्रारंभ केला. गडचिरोलीमधील अतिदुर्गम अशा पाच तालुक्यांसाठी अहेरी येथे उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आहे. येथून शंभरी गाठलेल्या दोन मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मतदान पथकाने 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून त्यांचे घर गाठले.
सिरोंचा तालुक्यातील 100 वर्षे वय असलेले किस्टय्या मादरबोईना आणि 86 वर्षे वय असलेल्या किस्ताय्या कोमरा या दोन मतदारांनी मतदान केलं. आजारी असल्याने खाटेवर पडून असलेले, जास्त वय झालेले वयोवृद्ध नागरिक यांना मतदानाची इच्छा असतानाही ते करू शकत नाही. अशा या दोन मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाही व्यवस्थेत आपला सहभाग नोंदवला. या नव्या व्यवस्थेमुळे वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदार यांना दिलासा मिळाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गडचिरोली-चिमुर लोकसभा निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे व सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवून गडचिरोलीच्या नावे देशात नवा विक्रम घडवावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी मतदारांना आवाहन केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.