Zinc Rich Food Saam Tv
लाईफस्टाईल

Zinc Rich Food : झिंकच्या कमतरतेमुळे शरीरावर होतोय परिणाम, आजच आहारात या पदार्थांचा समावेश करा

Zinc Deficiency Food : आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे पोषकतत्त्व हवे असते. त्यातील एक झिंक. झिंक हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असून याची कमतरता असल्यास गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

Zinc Deficiency :

आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे पोषकतत्त्व हवे असते. त्यातील एक झिंक. झिंक हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असून याची कमतरता असल्यास गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.

शरीराला जितकी व्हिटॅमिन्सची गरज आहे तितकेच झिंकची देखील. झिंकची कमकतरता झाल्यास शरीर आपल्याला संकेत देतात. बरेचदा आपण प्रथिने, जीवनसत्त्व, लोह आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश करतात. परंतु, झिंक कडे दुर्लक्ष केल्यास शरीरात त्याची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे झिंकची कमतरता टाळायची असेल तर या पदार्थांचा आहारात समावेश करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पदार्थांचा आहारात समावेश करा

1. मांस आणि भाज्या

लाल मांस हे आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच भाज्यांमध्ये देखील अधिक प्रमाणात झिंक असते. बटाटा (Potatoes), रताळे, राजमा, मशरुम आणि एवोकॉडो याचा आहारात समावेश करा.

2. फळे आणि जस्त

किवी, पेरु, डाळिंब, ब्लॅकबेरी, रास्पबेरी, ब्ल्यूबेरीमध्ये झिंक पुरेशा प्रमाणात आढळते. याचे नियमित प्रमाणात सेवन केल्यास झिंकची कमतरता भरुन काढण्यास मदत होते.

3. दूध आणि चीज

दुग्धजन्य पदार्थांमध्ये झिंक अधिक असते. झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी रोजच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करु शकता. यामध्ये तुम्ही दूध (Milk) आणि चीज खा.

4. तृणधान्ये

गहू, तांदूळ, ओट्स, क्विनोआ यांसारख्या संपूर्ण तृणधान्यांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. त्याचा वापर करुन आपण झिंकच्या कमतरतेवर मात करु शकतो. जीवनसत्त्व (Vitamins), फायबर, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि मँगनीज सारखे पोषक तत्व यामध्ये असतात. ज्याचा शरीराला फायदा होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT