Youtube Now Allow Anyone with 500 Subscribers to Earn Money Saam Tv
लाईफस्टाईल

Youtube Big News: यूट्युबवर पैसे कमावणे होणार सोपं; नवीन नियमांमुळे यूट्युबर्स होणार मालमाल!

जबरदस्त! आता Youtube वर 500 स्बस्क्र्याब होताच कमाई होईल सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Satish Kengar

Youtube Breaking News: सध्या असे अनेक लोक आहेत, जे नोकरी न करता YouTube साठी कंटेंट क्रिएट करून बक्कळ पैसे कमावत आहेत. मात्र यात असे अनेक कंटेंट क्रिएटर आहेत जे चांगले व्हिडीओ YouTube साठी बनवून अपलोड करतात, मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यातून त्यांना उत्पन्न मिळत नाही. अशाच युट्युब कंटेंट क्रिएटरसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

आता युट्युबवर फक्त 500 स्बस्क्र्याब झाले तरी तुम्हाला पैसे कमावता येईल. आधी ही मर्यादा 1000 स्बस्क्र्याब इतकी होती. मात्र आता युट्युबने नियमात बदल केले आहेत. स्बस्क्र्याब संख्या कमी केली म्हणून तुम्हाला युट्युब सहज पैसे देणार नाही. यासाठी आणखीही काही नियम आहेत, ज्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

नवीन बदलांसह YouTube लहान आणि नवीन कंटेंट क्रिएटरला संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने सांगितले आहे की, आता यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा (Youtube Partner Program 2023) भाग होण्यासाठी सध्याच्या मर्यादा आणि अटी बदलल्या जात आहेत. (Latest Marathi News)

कंटेंट क्रिएटरला कमाई करण्यासाठी आत्तापर्यंत असलेली किमान स्बस्क्र्याब आणि पाहण्याची वेळ मर्यादा कमी करण्यात आली आहे. आतापर्यंत चॅनेलवर किमान 1000 स्बस्क्र्याब आणि 4000 तास पाहण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली होती.

फक्त 500 स्बस्क्र्याब होताच कमाई होईल सुरू

नवीन पॉलिसीमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की, पूर्वी जिथे क्रिएटरला किमान 1000 स्बस्क्र्याबची आवश्यकता होती, आता ही मर्यादा 500 पर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा निम्मे स्बस्क्र्याब असतील तेव्हाच कमाई सुरू होईल. याशिवाय आधी चॅनेलवर किमान 4 हजार तास पाहण्याची वेळ असणे बंधनकारक होते, ती आता 2 हजार तासांवर आणण्यात आली आहे. (Youtube Channel Monetization)

याआधी शॉर्ट व्हिडीओ व्ह्यूजसाठी 10 मिलियन (1 कोटी) मर्यादा निश्चित करण्यात आली होती, जी नवीन पॉलिसीमध्ये बदलली आहे. आता क्रिएटर शॉर्ट व्हिडीओंवर 3 मिलियन (30 लाख) व्ह्यूजनंतर कमाईसाठी अप्लाय करू शकता. हे बदल सुरुवातीला यूएस, युनायटेड किंगडम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियासह निवडक बाजारपेठांमध्ये लागू केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT