WhatsApp Hack Saam TV
लाईफस्टाईल

WhatsApp Hack : सावधान! तुमचं What's App अकाउंट हॅक तर नाही झालं ना? घरबसल्या ५ मिनिटात असं तपासा

Check Whatsapp Account Hack or Not : प्रत्येकाच्या फोनमध्ये वेगवेगळे अ‍ॅप्स असतात. यामुळे सुरक्षेसाठी प्रत्येक अ‍ॅपबाबत दक्षता बाळगणे तितकेच गरजेचे आहे.

Aarti Ingle

सायबर हल्ल्यांचे प्रमाण सध्या वाढत आहेत. अशातच Whatsapp आल्यापासून लोकांचे आयुष्य यातच सामावून गेले आहे. WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत.

प्रत्येकाच्या फोनमध्ये वेगवेगळे अ‍ॅप्स असतात. यामुळे सुरक्षेसाठी प्रत्येक अ‍ॅपबाबत दक्षता बाळगणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशी ट्रीक सांगत आहोत, ज्याच्या मदतीने सहजपणे तुम्ही तुमचे Whatsapp अकाउंट हॅक झालं आहे का? हे तपासू शकता.

तुमचे WhatsApp अकाउंट हॅक झाले नाही ना? खालील बाबी तपासून बघा.

1. तुमची WhatsApp वेब सेटिंग तपासा त्यात तुमचे WhatsApp कुठे लिंक आहे हे बघा. कारण काही जण त्यांच्या फोनवर तुमचे खाते अ‍ॅक्सेस करतात.

2. तुमची WhatsApp प्रोफाईलची माहिती अपडेट केली आहे का तपासा. उदाहरणार्थ, तुमचा डिस्प्ले फोटो, तुमचे नाव बदलले असेल.

3. तुमचे WhatsApp चॅट तपासा. हॅकर्सनी तुमची चॅट उडवली असेल तर तुम्हाला सहज कळेल.

4. तुमचे WhatsApp हॅक झाले असेल तर कोणताही व्हिडिओ आपोआप डाउनलोड होत नाही.

5. अनोळखी नंबरवरून वारंवार मेसेज येत असेल तर हॅकिंगची समस्या असू शकते.

6. आलेले मेसेज कुठेतरी वाचले जातात की नाही, हे तपासा, जर ते वाचले जात असतील तर समजा व्हॉटसअप हॅक झाले आहे.

7. WhatsApp वेब सेटिंग तपासा त्यात Chat  Transfer या ऑप्शनवर क्लिक करा. जर Chat  Transfer झाली असेल तर तुमचे WhatsApp हॅक झाले आहे.

वरील बाबी तुम्ही तपासून बघा त्याच्या मदतीने तुम्हाला कळेल तुमचे WhatsApp हॅक झाले आहे का नाही. तसेच WhatsAppवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी त्यामुळे तुमचे WhatsApp हॅक होण्यापासून वाचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT